सहा दिवसांत चोरट्यांचा शोध ! गुन्हे शाखेने चोरट्यांकडून हस्तगत केला पावणेतीन लाखांचा मुद्देमाल 

तात्या लांडगे 
Thursday, 29 October 2020

नवी पेठेत कपडे खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला गेली होती. तर दुसरीकडे सोलापूर बस स्टॅण्डवरून मुरूम येथे आई-वडिलांकडे जाण्यासाठी बसची वाट पाहात असलेल्या महिलेची पिशवी चोरी झाली होती. तर एमआयडीसी हद्दीतही चोरीची फिर्याद दाखल झाली होती. या तिन्ही प्रकरणांचा गुन्हे शाखेने उलगडा करीत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सोलापूर : नवी पेठेत कपडे खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला गेली होती. तर दुसरीकडे सोलापूर बस स्टॅण्डवरून मुरूम येथे आई-वडिलांकडे जाण्यासाठी बसची वाट पाहात असलेल्या महिलेची पिशवी चोरी झाली होती. तर एमआयडीसी हद्दीतही चोरीची फिर्याद दाखल झाली होती. या तिन्ही प्रकरणांचा गुन्हे शाखेने उलगडा करीत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

मंगळवारी (ता. 20) नवी पेठेत खरेदीसाठी गेलेल्या महिलेने दुचाकीवर पर्स ठेवली होती. त्याच वेळी महिलेची नजर चुकवून चोरट्याने त्यांच्याकडील पर्स चोरून पलायन केले. त्या पर्समध्ये 84 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल असल्याने त्या महिलेने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. तर 22 ऑक्‍टोबरला चोरट्याने एसटी स्टॅण्ड परिसरातून एका महिलेच्या मुलाजवळील बॅग चोरली. त्या बॅगमध्ये सोने- चांदीच्या दागिन्यांसह एक लाख 96 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल होता.

त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन संशयित चोरट्यांवर पाळत ठेवली. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अजित कुंभार यांच्या पथकाने संशयित चोरट्यांना पकडले. त्यात ओंकार कल्याणी चाकोते (रा. उत्तर कसबा), सतीश दत्ता जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. सहा) आणि महमंद आलम रफिक कुरेशी, लक्ष्मी शिवाजी भोसले यांचा समावेश आहे. ही कामगिरी श्री. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली बाबर कोतवाल, राकेश पाटील, विजय वाळके, संतोष फुटाणे, संदीप जावळे, विनायक बेर्डे, वसंत माने, सचिन बाबर, उमेश सावंत, स्वप्नील कसगावडे, समर्थ शेळवणे, आरती यादव, आयेशा फुलारी, संजय काकडे, विजय निबांळकर यांच्या पथकाने केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Branch police arrested the thieves within six days