विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त

Gunhe Vrutt
Gunhe Vrutt
Updated on

सोलापूर : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून मुलीला सासरच्या लोकांनी वारंवार शिवीगाळ करून उपाशी ठेवून छळ केल्याची फिर्याद विवाहितेची आई मंगल गणपती कोरे यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी पती सोमनाथ भुजबळे, सासू सिंधू भुजबळे, चुलत सासरे शिवानंद भुजबळे, चुलत सासू मंगल भुजबळे आणि चुलत दीर अमोल भुजबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

बेशिस्त वाहनचालकांना 12 लाखांचा दंड 
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने शहर पोलिसांनी सात पोलिस ठाण्याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांवर आणि विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार पोलिसांनी 17 ऑगस्टपासून 11 हजार 745 वाहनचालकांकडून 12 लाख 16 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी (ता. 9) 119 जणांकडून पोलिसांनी 11 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, जुना पूना नाका या परिसरात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

मास्क न घालणाऱ्यांकडून 43 लाखांचा दंड वसूल 
शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. त्यासाठी मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज वापरावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन महापालिकेने केले. तरीही नियमांचे उल्लंघन केल्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई केली जात आहे. शहरातील आठ विभागीय कार्यालयाअंतर्गत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 43 हजार 650 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

शहरात 41 ठिकाणे प्रतिबंधित 
ज्या भागात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, त्या परिसराला महापालिकेतर्फे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. सध्या शहरात 41 ठिकाणे प्रतिबंधित असून त्यात विजयपूर रोड, सोरेगाव, जुळे सोलापुरातील काही नगरे, सैफूल, शेळगी, विडी घरकुल, अक्‍कलकोट रोडवरील काही नगरांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून त्या ठिकाणच्या नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com