मोठा गुंड होण्याच्या नादात केला एकावर खुनी हल्ला ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त 

Gunhe Vrutt
Gunhe Vrutt
Updated on

सोलापूर : मोठ्या व्यक्तीला मारून आपण देखील मोठे गुंड होण्याच्या नादात एका व्यक्तीवर शहरातील पूर्व भागातील विनायक नगर परिसरात खुनी हल्ला झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

एका जुन्या गॅंगमधील व्यक्तीवर खुनी हल्ला झाला असून, त्यात अमृत हणमंत माशाळकर हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, विकी ऊर्फ टिल्या जालिंदर मंजूळकर, सोफीलाल महंमद हुसेन शहापुरे, अभिषेक रामू म्हेत्रे, नागेश याच्यासह त्यांच्या तीन साथीदारांनी बुधवारी (ता. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा खुनी हल्ला केला. 

या हल्ल्यात काठ्या, लोखंडी रॉड व दगडांचा वापर करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास सर्व संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मोरे करत आहेत. 

सिद्धेश्‍वर तलावात बुडून मुलाचा मृत्यू 
अशोक चौक परिसरातील दहा वर्षांचा तौफिक मित्रासोबत श्री सिद्धेश्‍वर तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास तलावानजीक बसलेल्या तौफिक सादिक शेख (वय 10) याचा पाय घसरला. त्यानंतर तो तलावात पडला. तलावात पडल्याने तौफिकचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुसरा मुलगा वाचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तौफिक शेख व फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोचले. 

तौफिकला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तौफिकचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com