
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील बंद दुकानातून चोरट्याने 19 हजार 900 रुपयांचा लसूण पळविला आहे. चोरट्याने बंद दुकानासमोरील लोखंडी शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्याने दुकानातील पाच पोती लसूण चोरून नेल्याची फिर्याद मैनोद्दीन अखलाक जहागीरदार यांनी जेलरोड पोलिसांत दिली. ही घटना 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान घडली आहे. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
विजयपूर रोडवर अडीच लाखांची चोरी
विजयपूर रोडवरील पापाराम नगरातील निर्मला प्रभू राऊतगळ यांच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख 25 हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ही घटना 22 ते 23 नोव्हेंबरदरम्यान घडली आहे. निर्मला राऊतगळ यांनी याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याने घरातील लोखंडी कपाटातून एक लाख 80 हजारांचे दागिने व 45 हजारांची रोकड पळविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मुलाणी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
वृद्धेला फसवून मंगळसूत्र लांबविले
बाळे ब्रीजजवळील सर्व्हिस रोड ते शिवाजीनगर, बाळे दरम्यान दोन अनोळखी महिला व एका मुलीने 65 वर्षीय आजीची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. राधा मनोहर बंडगर असे त्या वद्ध महिलेचे नाव आहे. बंडगर या वडाळा येथील शेतीचे काम संपवून एसटीने बाळे येथे आल्या. त्यानंतर त्या बाळे येथील ब्रीज परिसरात थांबल्या. त्या वेळी पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने त्यांना कुठे जायचे, असे विचारले. राधा बंडगर या कारमध्ये बसल्या. त्यांना बोलण्यात गुंतवून कारमधील महिलेने त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पळविले. या प्रकरणी त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिस हवालदार श्री. शेख हे पुढील तपास करीत आहेत.
बेशिस्त वाहनचालकांना साडेचौदा लाखांचा दंड
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाहनचालकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. तरीही मास्क न घालता, वाहन चालविण्याचा परवाना नसताना, वाहनाची कागदपत्रे अपूर्ण असतानाही रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यात रस्त्यालगत वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने लावणाऱ्यांचाही समावेश आहे. 17 ऑगस्टपासून शहर वाहतूक पोलिसांनी तब्बल 14 हजारांहून अधिक वाहनचालकांकडून 14 लाख 50 हजारांपर्यंत दंड वसूल केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, दीपाली धाटे-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.