
सोलापूर : पूर्व वैमनस्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे राजू शिवाजी राठोड (वय 29) आणि कस्तुराबाई शिवाजी राठोड (वय 42) या दोघांना अर्जुन जाधव, कुमार जाधव, प्रकाश जाधव, ध्रुवपती जाधव, शुषाबाई राठोड यांनी लाथाबुक्क्याने व तलवारीने मारून जखमी केले. दोघांनाही जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
वडगावच्या विहिरीत आढळला वृद्धेचा मृतदेह
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीजवळील वडगाव येथील सोमशेखर कोडगे यांच्या शेतातील विहिरीत शकुंतला निंगप्पा गायकवाड (वय 60) या वृद्ध महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळून आला. पांडुरंग गायकवाड यांनी शकुंतला यांचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
घरगुती कारणावरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
घरात झालेल्या तक्रारीमुळे सुग्रीव महादेव चौधरी (वय 25, रा. नरखेड, ता. मोहोळ) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुग्रीव यास त्रास होऊ लागल्यावर त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दारूच्या नशेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे दारूच्या नशेत चंद्रकांत भोजलिंग मोरे (वय 35) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोरे यास त्रास होऊ लागल्यावर त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
हिप्परगा ब्रीजवर अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर ते तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा ब्रीजजवळ रांगोळी कारखान्याजवळ पायी जाणाऱ्या विकास नागनाथ बाबरे (वय 31, रा. वावरे वस्ती, लक्ष्मी मंदिर, बेलाटी) यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. जखमी अवस्थेत विकास बाबरे यास जोडभावी पेठ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांस डॉक्टरांनी मृत घोषित केले.
डोणगाव येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे हरिदास जालींदर गायकवाड (वय 75) या वृद्धाने परमेश्वर आमले यांच्या शेतात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावातील लोकांनी गायकवाड यांना खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.