गुन्हे वृत्त : सोलापुरात तिघांनी केला आत्महत्येचा प्रयत्न ! 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on: 

सोलापूर : पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून एकाने व कर्ज झाल्याच्या कारणामुळे एकाने तसेच आई रागावल्यामुळे एकाने असे सोलापूर व परिसरातील तिघांनी बुधवारी (ता. 23) आत्महत्येचा प्रयत्न केला. यासंबंधी त्या - त्या पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झाली असून, पोलिस अधिकारी तपास करीत आहेत. 

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 
बायको माहेरी गेल्याच्या कारणावरून बसवंतराव रामण्णा निंगदर्ळी (वय 28, रा. सलगर, ता. अक्‍कलकोट) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बसवंतराव याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

कर्जाच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न 
कर्ज झाल्याच्या कारणावरून बिल्कीस अमजद कुरेशी (वय 30, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर, सध्या शेटे वस्ती, सोलापूर) या तरुणाने थॉईराईड आजाराच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न 
आईने रागावल्याने दिव्या दशरथ वगरे (वय 13, रा. मार्कडवाडी, ता. माळशिरस) या मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिव्याला त्रास होऊ लागल्याने तिचे काका ज्ञानेश्‍वर वगरे यांनी तिला उपचारासाठी दाखल केले आहे. 

दुचाकीच्या धडकेने वृद्ध जखमी 
मोहोळ येथील गायकवाड मंगल कार्यालयाकडे पायी जाणाऱ्या नागनाथ भगवान वाघमोडे (वय 65, रा. अण्णाभाऊ साठे नगर, मोहोळ) यांना अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्‍यास मार लागून ते जखमी झाले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

मारहाणीत वृद्ध जखमी 
समाईक विहिरीच्या कारणावरून बाबूराव लिंबा भुरे (वय 60, रा. वाघोली, ता. मोहोळ) या वृद्धास शेतात पाणी देत असताना विठ्ठल लिंबा भुरे व इतर तिघांनी काठीने मारहाण करून जखमी केले. बाबूराव भुरे यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

दुचाकीवरील दोघे जखमी 
नान्नजला दुचाकीवरून जात असताना विवेकानंद शाळेच्या समोर क्र. एमएच 13 सीटी 2027 या रिक्षाच्या चालकाने रिक्षा भरधाव चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चंद्रकांत भीमाशंकर कुंभार (वय 37) आणि हणमंत सिद्धाराम तोडकर (वय 37, दोघे रा. करजगी, ता. अक्‍कलकोट) हे दोघे जखमी झाले. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com