उसने पैशासाठी त्रास दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on

सोलापूर : उसने घेतलेले पैसे देण्यासाठी नसीमा पठाण, चॉंदतारा मुजावर, रजिया शेख या महिलांनी त्रास दिल्याने मुमताज शेकू शेख (वय 40, रा. भाग्यलक्ष्मी नगर, नई जिंदगी, सोलापूर) या महिलेने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुमताज शेख यांना त्रास होऊ लागल्याने इरफान शेख यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

मोबाईल चोरीची घटना 
रंगभवन चौकामध्ये एसटी बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाच्या खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरल्याची घटना घडली. याबाबत जयशेखर शिवबसप्पा पाटील (वय 60, रा. सलगर, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रफिक हसन शेख, अखलाक इमामसाब महाजबडे आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक लिगाडे पुढील तपास करीत आहेत. 

दुचाकीस्वार जखमी 
कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्रदीप चंद्रकांत खराडे (वय 30, रा. कामती बु, ता. मोहोळ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोहोळ ते कामती रोडवरील परमेश्‍वर पिंपरी देवस्थानासमोर झाला. जखमी खराडे याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

तरुणाची आत्महत्या 
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज येथील शंकर बाबू जानराव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास बेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन प्रभाकर दत्तात्रय कांबळे (वय 35) या तरुणाने आत्महत्या केली. कांबळे याच्या नातेवाइकांनी प्रभाकर कांबळे याला बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

बरूर येथे मारहाण 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बरूर येथे तमराया भीमाशंकर मकनापुरे (वय 23) यास गुरुवारी सायंकाळी गावातील हायस्कूलजवळ ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मल्लिकार्जुन शिरढोणकर यांच्याशी बोलताना संतोष शिरढोणकर याने लाकडाने मारहाण केली. मकनापुरे यास डोक्‍यास मार लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

गरम पाण्याने बालक भाजला 
खेळताना गरम पाणी अंगावर पडल्याने जय कुमार सुरवसे (वय 7, रा. क्रांती नगर, सोलापूर) हा मुलगा अंग व पाय भाजून जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून जय यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com