पत्नीबरोबर वाद झाल्याने केला पतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न ! 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on

सोलापूर : संजय गांधी नगर झोपडपट्टी क्रमांक दोन येथील अनिल नानासाहेब शिंगाडे (वय 29) या तरुणाचे त्याची पत्नी प्रियंका हिच्यासोबत वाद झाला. या वादातून अनिलने राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला. त्याला बेशुद्ध अवस्थेत अनिलचे वडील नानासाहेब यांनी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अनिलवर उपचार सुरू असून, तो अद्याप बेशुद्ध असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

गर्भवती पत्नीला पतीची मारहाण 
कुमठा नाका परिसरातील महाराणा प्रताप झोपडपट्टी येथील वंदना नारायण माने (वय 29) यांना घरगुती वादातून पतीने पोटावर मारहाण केली. वंदना या गर्भवती असल्याने त्यांना मारहाणीनंतर त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार असून, महिला शुद्धीवर असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

पतीसोबत झालेल्या वादातून पत्नीने सेवन केले विष 
पतीसोबत झालेल्या वादातून पत्नीने पिवळा सडा मारण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने कविता अंबादास कंगेटी (वय 19) यांना पतीने स्वत: श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कविता कंगेटी यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

मागील भांडणातून तरुणास मारहाण 
आठ-दहा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आठ ते नऊ जणांनी मारहाण केल्याची फिर्याद अनिल नारायण शिंगारे (रा. जयशंकर तालीमसमोर, मोदी) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. लोखंडी रॉड व फायबरच्या पाइपने मारहाण केल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार किरण विष्णू विटेकर व त्याचा लहान भाऊ, चेतन म्हेत्रे, किटू देविदास जगले, संदेश विटेकर व अन्य तीन ते चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अनिल शिंगारे याने मागील भांडणाच्या रागातून लोखंडी रॉडने पायावर मारहाण केल्याची फिर्याद किरण विटेकर याने पोलिसांत दिली आहे. 

पायी जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्‍टरची धडक 
हळदुगे (ता. बार्शी) येथून रस्त्याने पायी चालत जाताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्‍टरने जोरात धडक दिली. या अपघातात जया प्रल्हाद सूर्यवंशी (वय 65) यांच्या पायास गंभीर जखम झाली असून, त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत आहे. 

कुकरचे झाकण काढताना वाफ लागली 
शास्त्रीनगर येथील अंबादास लक्ष्मण नल्ला हे कुकरचे झाकण काढत होते. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यास कुकरमधील वाफ लागली आणि त्यांचा चेहरा भाजला. त्यांना नरसिंग गोरंट्याल यांनी उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com