esakal | शहरात पुन्हा वाढताहेत खासगी सावकारकीचे गुन्हे ! व्याजाच्या पैशावरून घर पेटवून देण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News in Solapur City

या पार्श्वभूमीवर अशा तक्रारी कमी होतील ही आशा फोल ठरत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी (ता. 6) खासगी सावकारांनी त्रास दिल्याच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शहरात पुन्हा वाढताहेत खासगी सावकारकीचे गुन्हे ! व्याजाच्या पैशावरून घर पेटवून देण्याची धमकी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरात काही महिन्यांपूर्वी खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आशा तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला. काही सावकारांवर कारवाई देखील झाली. या पार्श्वभूमीवर अशा तक्रारी कमी होतील ही आशा फोल ठरत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी (ता. 6) खासगी सावकारांनी त्रास दिल्याच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कौटुंबिक अडचणीमुळे प्रविण चंद्रकांत लकशेट्टी (रा. कल्याण नगर भाग-दोन) यांच्या आईने वंदना बेटगिरी यांच्याकडून दहा टक्‍के व्याजदराने 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर गरज पडल्यानंतर आणखी एक लाख रुपये घेतले. पुन्हा अडचणीवेळी टप्प्याटप्याने असे एकूण पाच लाख रूपये व्याजाने घेतले. वेळोवेळी व्याज देऊनही तीन महिन्यांपूर्वी पैसे द्या, नाहीतर घर माझ्या नावावर करा म्हणून बटगेरी यांनी पोलिसांना सांगितले.

पैसे परत केल्यानंतरच घर परत करु, असेही बटगेरी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी वंदना बटगेरी, ओंकार बटगेरी, संभाजी निकम, रमेश कमलाकर चौगुले, रत्नाबाई यांनी घरी येऊन पैसे द्या, नाहीतर घर खाली करा असे म्हणत घर आणि तुला जाळतो, अशी धमकी दिली. मारण्यासाठी अंगावरही धावून आले, अशी फिर्याद लकशेट्टी यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यावरून सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. मस्के हे पुकरीत आहेत.

व्याजाच्या पैशावरुन महिलेला दिला त्रास

सोलापूर : व्याजाने घेतलेले 25 हजार रुपये परत करुनही व्याज आणि मुद्दल, अशी एकूण 50 हजार रुपये आणखी द्यावे लागतील, असे विद्या अशोक माने (रा. मोरया गणपतीजवळ) यांनी अलका दिपक जाधव (रा. मौलाली दर्ग्याजवळ, लिमयेवाडी) यांना सांगितले. मात्र, मूळ रक्‍कम परत करुनही त्यांनी मोठी रक्‍कम मागून त्रास दिल्याप्रकरणी जाधव यांनी सलगर वस्ती पोलिस ठाणे गाठले. त्यावरून मानेविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. वाघमारे हे करीत आहेत.

एकाच दिवसात दीड लाखांचा दंड वसूल

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांनी नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मास्क न घालता शहरात फिरणाऱ्या 224 जणांकडून पोलिसांनी एक लाख 12 हजार रुपयांचा तर नियमांचे उल्लंघन करीत दुकान चालविणाऱ्या 14 जणांकडून 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत ही कारवाई केली असून नियम मोडणाऱ्यांना पुन्हा नियम न मोडण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत.