esakal | ब्रेकिंग : देगाव ओढ्यातील मगर पकडली : पुण्यातील 'रेस्क्‍यू'चे यश 
sakal

बोलून बातमी शोधा

2magar_5.jpg

ठळक बाबी... 

  • देगाव येथील सांडपाण्याच्या ओढ्यात काही महिन्यांपूर्वी दिसली होती मगर 
  • अस्वच्छ पाण्यामुळे पकडण्यासाठी सापळा टाकूनही मिळत नव्हते यश 
  • वन विभागाने लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार सातत्याने ठेवले होते लक्ष 
  • मगरीला पकडण्यासाठी 'रेस्क्‍यू'च्या दहा सदस्यांचे होते सोलापुरात ठाण 
  • पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांच्यामार्फत होईल मगरीची तपासणी 

ब्रेकिंग : देगाव ओढ्यातील मगर पकडली : पुण्यातील 'रेस्क्‍यू'चे यश 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : देगाव येथील सांडपाण्याच्या ओढ्यातील मगर पकडण्यात वन विभागाला आज यश आले. पुण्यातील 'रेस्क्‍यू' या टीमने मगरीला पकडले. तत्पूर्वी, 7 सप्टेंबरपासून सापळा रचून मगरीवर वॉच ठेवण्यात आला होता. 

ठळक बाबी... 

  • देगाव येथील सांडपाण्याच्या ओढ्यात काही महिन्यांपूर्वी दिसली होती मगर 
  • अस्वच्छ पाण्यामुळे पकडण्यासाठी सापळा टाकूनही मिळत नव्हते यश 
  • वन विभागाने लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार सातत्याने ठेवले होते लक्ष 
  • मगरीला पकडण्यासाठी 'रेस्क्‍यू'च्या दहा सदस्यांचे होते सोलापुरात ठाण 
  • पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांच्यामार्फत होईल मगरीची तपासणी 

पावसाळ्याच्या मुहूर्तावर ओढ्यात मोठी मगर दिसल्याने नागरिक तथा पशुपालकांमध्ये घरबाट होती. त्यानंतर वन विभागाने त्याठिकाणी पाहणी करुन मगरीच्या हालचालीचे तिच्या राहण्याच्या तीन जागा निश्‍चित केल्या. त्यानुसार वन विभागाने नगर, पुणे येथील वन्यजीव प्रेमींची मदत घेतली. मात्र, पावसामुळे मगर पाण्याबाहेर कमी येऊ लागली. वन विभागाने एका मध्यवर्ती ठिकाणी मोठा खड्डा खोदून मगरीला पकडण्याचेही नियोजन केले. मात्र, त्याला यश आले नसल्याने वन विभागाने पुण्यातील 'रेस्क्‍यू' टीमला बोलावले होते. त्यांनी मगरीला पकडण्यासाठी चिकन, मटन ठेवून मगरीसाठी सापळा रचून सातत्याने वॉच ठेवला. अखेर मंगळवारी (ता. 15) रात्री साडेसातच्या सुमारास मगर त्या सापळ्यात अडकली. वन विभागाने तिला पकडून वैद्यकीय तपासणीसाठी नेले असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी चेतन नलावडे यांनी दिली. उपवन संरक्षक सुवर्णा माने, सहायक उपवनसंरक्षक इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कार्यवाही पार पडली.