esakal | मगरीचे पिल्लू सापडले, पण पिल्लाची आई कुठे आहे? ! वन विभाग व प्राणीसंग्रहालयाचे तोंडावर बोट

बोलून बातमी शोधा

0crocodile_2.jpg}

महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाजवळील रेवणसिध्द मंदिर परिसरात पंधरा महिन्यांचे मगरीचे पिल्लू पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. त्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यामुळे मगरीच्या प्रकरणावर पडदा पडला, परंतु हे पिल्लू नेमके कुठून आले, त्याची आई कुठे आहे, याबाबत वन विभाग व प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी तोंडावर बोट ठेवले आहे.

मगरीचे पिल्लू सापडले, पण पिल्लाची आई कुठे आहे? ! वन विभाग व प्राणीसंग्रहालयाचे तोंडावर बोट
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाजवळील रेवणसिध्द मंदिर परिसरात पंधरा महिन्यांचे मगरीचे पिल्लू पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. त्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यामुळे मगरीच्या प्रकरणावर पडदा पडला, परंतु हे पिल्लू नेमके कुठून आले, त्याची आई कुठे आहे, याबाबत वन विभाग व प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी तोंडावर बोट ठेवले आहे.

नैसर्गिक अधिवासात सोडली मगर
नागपूर प्रधान मुख्य कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर मगरीच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्या पिल्लाला मगर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
- धैर्यशील पाटील, उपवनसरंक्षक सोलापूर

रेवणसिध्द मंदिर परिसरातील मगर ही शेजारील प्राणीसंग्रहालयातील असल्याचा अंदाज होता. मात्र, प्राणीसंग्रहालयातील मगरीची संख्या मोजल्यानंतर ती मगर त्याठिकाणाहून गेलेली नाही, हे स्पष्ट झाले. प्राणीसंग्रहालयात लहान-मोठ्या 20 मगरी आहेत. या पिल्ल्याबाबत प्राणी संग्रहालयाकडे कोणत्याच अस्तित्वाची नोंद केली नव्हती. त्यामुळे वनखाते व निसर्गप्रेमींनी मगरीच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष ठेवले. त्यामध्ये उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी बाबा हाके, वन परिमंडळ अधिकारी ईर्शाद शेख, वनरक्षक शंकर कुताटे, वन मजूर बापूराव भोई, तुकाराम बादने, राम हरी निरवणे, नेचर कॉन्झरव्हेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, आदित्य घाडगे, धनंजय काकडे आदींचा सहभाग होता. पंधरा दिवस मगरीवर लक्ष ठेवल्यानंतर शनिवारी (ता.27 ) मगरीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. रविवारी (ता. 28) मगर पिंजऱ्याद्वारे पकडण्यात आली. वन खात्याने मगरीची वैद्यकीय तपासणी केली. त्यात 12 ते 13 महिन्यांचे ते मगरीचे पिल्लू असल्याचे समोर आले. ते पिल्लू परिसरातील इतर कोणत्यातरी जलअधिवासातून आली असावी, याबाबत काही शोध लागत नव्हता. मगरीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्‍नचिन्ह कायम आहे. ही मादी जातीची मगर असून तिचे वय केवळ एक वर्षाचे आहे. वन खात्याच्या दृष्टीने अतीदुर्मिळ प्रकारात म्हणजे शेड्यूल-वन प्रकारात मगरीची गणना केली जाते. नागपूरच्या मुख्य प्रधान कार्यालयाकडून मगरीच्या सुटकेची परवानगी मिळाल्यानंतर रविवारी (ता. 28) सायंकाळी त्या पिल्ल्याला नैसर्गिक जल अधिवासात सोडण्यात आले.

दुसऱ्या प्रयत्नात सापडले मगरीचे पिल्लू
मगरीला पकडण्यासाठी पहिल्यांदा पिंजरा लावला होता. मगर पिंजऱ्यापर्यंत आली, परंतु त्याचवेळी मुंगूस आल्याने घाबरून ती मगर नाल्यात लपून बसली. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 28) ही मगर अलगदपणे जाळ्यात पकडली.
- पप्पू जमादार, सदस्य, नेचर कॉन्झरव्हेशन सर्कल सोलापूर