सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज नवा उच्चांक; आज सर्वाधिक 663 रुग्ण 

संतोष सिरसट 
Saturday, 12 September 2020

पंढरपूर तालुक्‍यात एकाच दिवशी 151 रुग्ण 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून पंढरपूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागामध्ये 151 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर पंढरपूरच्या नागरी भागामध्ये एकूण 40 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर माळशिरस तालुक्‍याच्या ग्रामीण भागामध्ये 93 बार्शी च्या ग्रामीण भागामध्ये 19 तर शहरी भागामध्ये 88 करमाळ्याच्या ग्रामीण भागामध्ये 41, मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागामध्ये 40, सांगोल्याच्या ग्रामीण भागामध्ये 22, नागरी भागामध्ये 33, दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये पाच, "उत्तर'च्या ग्रामीण भागांमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 434 तर जिल्ह्याच्या नागरी भागामध्ये 229 असे दोन्ही म्हणून 663 जण कोरोनाबाधित झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालावरुन स्पष्ट होते. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येचा नवा उच्चांक निर्माण होत आहे. आज आतापर्यंत सर्वाधिक 663 जण कोरोनाबाधित झाले असल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज चार हजार 68 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार 405 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 663 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 13 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत 16 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 481 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अद्यापही पाच हजार 454 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरे गेलेल्यांची संख्या 10 हजार 103 इतकी झाली आहे. आज सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 55 वर्षाची महिला, वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 55 वर्षाचे पुरुष, श्रीपूर (ता. माळशिरस) येथील 45 वर्षाची महिला, उमदे गल्ली पंढरपूर येथील 73 वर्षाचे पुरुष, अरण (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष, माळखांबी (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील 65 वर्षाचे पुरुष, माळीनगर (ता. माळशिरस) येथील 41 वर्षाचे पुरुष, महूद नाका चिंचोली रोड सांगोला येथील 58 वर्षाचे पुरुष, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 58 वर्षाचे पुरुष, बबलाद (ता. अक्कलकोट) येथील 47 वर्षाचे पुरुष, मंगळवार पेठ बार्शी येथील 63 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily new highs in rural areas of Solapur district; Today the highest is 663 patients