बापरे..! कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाचा धोका ! 

प्रमोद बोडके 
Tuesday, 11 August 2020

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद म्हणाले, पहिल्यांदा कोरोना झाल्यानंतर दुसऱ्यांदा किती दिवसांत कोरोना होऊ शकतो, याची ठोस व तांत्रिक माहिती अद्याप उपलब्ध नाही. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याच्या अनेक घटना आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात मात्र दुसऱ्यांदा कोरोनाग्रस्त होण्याची घटना अद्याप घडलेली नाही. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अंत्यत आवश्‍यक आहे. 

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाची स्थिती अजब आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींचा टक्का जसा सर्वाधिक आहे तसाच सर्वाधिक टक्का हा कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आहे. एकदा कोरोना येऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही, असाच काहीजणांचा समज आहे. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुन्हा एकदा कोरोनाचा धोका त्या व्यक्तीला आहे. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर मात्र धोका अधिक असल्याचेही वैद्यकीय पाहणीतून समोर आले आहे. 

हेही वाचा : धक्कादायक ! मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून "या' गावात मुलाच्या वडिलास झाडाला बांधून मारहाण 

ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त असलेल्या ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना प्लाझ्मा थेरपी उपयुक्त मानली जाते. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने त्रस्त असलेल्या कोरोनाग्रस्ताला दिल्या जातात. त्यातून त्या कोरोनाग्रस्ताला तात्पुरती प्रतिकारशक्ती मिळते, त्यातून ते बरेही होतात. परंतु त्यांना नंतर कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याची माहिती सोलापुरातील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद यांनी दिली. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तूर्तास प्लाझ्मा संकलन आणि साठवण करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या आतापर्यंत 20 हून अधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दिला आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

हेही वाचा : कोरोना ड्यूटी रद्दसाठी वशिलेबाजी; खासगी, प्राथमिक, माध्यमिक, महापालिका शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक 

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद म्हणाले, पहिल्यांदा कोरोना झाल्यानंतर दुसऱ्यांदा किती दिवसांत कोरोना होऊ शकतो, याची ठोस व तांत्रिक माहिती अद्याप उपलब्ध नाही. कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याच्या अनेक घटना आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात मात्र दुसऱ्यांदा कोरोनाग्रस्त होण्याची घटना अद्याप घडलेली नाही. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अंत्यत आवश्‍यक आहे. 

7 हजार 398 जण झाले कोरोनामुक्त 

 • सोलापूर शहर : 4065 
 • अक्कलकोट : 450 
 • बार्शी : 799 
 • करमाळा : 99 
 • माढा : 194 
 • माळशिरस : 177 
 • मंगळवेढा : 92 
 • मोहोळ : 153 
 • उत्तर सोलापूर : 256 
 • पंढरपूर : 458 
 • सांगोला : 86 
 • दक्षिण सोलापूर : 569 

आकडे बोलतात... 
दर/टक्का            सोलापूर        राज्य             देश 
रिकव्हरी रेट         60.41           65.37           66.31 
पॉझिटिव्हीटी रेट   13.4             20.9             09.00 
डेथ रेट                2.95            03.2              01.7 
डबलिंग रेट       14 दिवस     36.1 दिवस      25.6 दिवस 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger of corona again even after corona release