हृदयद्रावक! कॅनॉलमध्ये गाडी कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; गावावर शोककळा

मोहन काळे
Sunday, 24 January 2021

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास अर्धा कॅनॉल पाण्याने भरून वाहत आहे.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : माळेगाव (ता. माढा ) येथे पाण्याने भरलेल्या उजनी धरणाच्या डाव्या कॅनॉलमध्ये छोटा हत्ती हे वाहन पडून झालेल्या दुर्घटनेत    बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता माणिक लोकरे यांच्या शेताजवळ घडली आहे. 

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास अर्धा कॅनॉल पाण्याने भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत माळेगाव ( ता. माढा,जि.सोलापूर) येथे राहणारे तात्यासाहेब बाळू माने (कोळी) हे आपल्या सहा वर्षाच्या आरती नावाच्या मुलीसह छोटाहत्ती हे वाहन कॅनॉलच्या साईड पट्टीवरून चालवत असताना त्यांचे वाहन पाण्याने वाहत्या कॅनॉलमध्ये पडले. या वाहनातून त्यांना लवकर बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडालेल्या वाहनातच गुदमरून मृत्यू झाल्याचे बघणाऱ्या लोकांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ही घटना कोणालाच लवकर समजली नाही. शेतातील लाईट आल्यावर काही शेतकरी कॅनॉलवरील विद्युत पंप सुरु करण्यासाठी आल्यावर त्यांना पाण्यात छोटा हत्ती पडल्याचे दिसले. त्यानंतर सगळीकडे ही खबर वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकरी व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले. मात्र पाण्यात अडकलेले वाहन दुपारी बारा वाजेपर्यंत तरी बाहेर काढले नव्हते. मात्र या दुर्दैवी घटनेची हळहळ मिटकलवाडी व माळेगावात व्यक्त केली जात आहे . 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daughter and father die after small elephant falls into left canal of Ujani dam near Malegaon