esakal | अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आईला मुलीनेच संपविले ! दिरासोबतच्या अनैतिक संबंधास केला होता विरोध 
sakal

बोलून बातमी शोधा

1husband_wife_0.jpg

घटनाक्रम... 

  • लक्ष्मीबाई माने (नणंद) यांचा खून झाल्याची 8 नोव्हेंबरला दिली कविता भोसले यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी दोनच दिवसात शोधले संशयित आरोपी 
  • आईने मुलीच्या अनैतिक संबंधास केला होता विरोध; मुलीचे तिच्या दिरासोबतच होते अनैतिक संबंध 
  • तोरवी, विजयपूर (कर्नाटक) येथून दोघांना पोलिसांनी केली अटक; दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी 
  • अनिता महादेव जाधव व शिवानंद भिमप्पा जाधव, अशी आहेत संशयित आरोपींची नावे 

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आईला मुलीनेच संपविले ! दिरासोबतच्या अनैतिक संबंधास केला होता विरोध 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कुमठे येथील महालक्ष्मी नगरात एकट्याच राहणारी नणंद लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) यांचा खून केल्याची फिर्याद कविता भोसले यांनी विजापूर नाका पोलिसांत रविवारी (ता. 8) नोंदविली. त्यानंतर घटनास्थळावरुन विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना गळा दाबून खून केल्याचे समजले. पोलिसांनी तपासासाठी पथके नियुक्‍त करुन विजयपूरला पाठविली. त्यावेळी मुलीनेच अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या आईला संपविल्याचे समोर आले.

घटनाक्रम... 

  • लक्ष्मीबाई माने (नणंद) यांचा खून झाल्याची 8 नोव्हेंबरला दिली कविता भोसले यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी दोनच दिवसात शोधले संशयित आरोपी 
  • आईने मुलीच्या अनैतिक संबंधास केला होता विरोध; मुलीचे तिच्या दिरासोबतच होते अनैतिक संबंध 
  • तोरवी, विजयपूर (कर्नाटक) येथून दोघांना पोलिसांनी केली अटक; दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी 
  • अनिता महादेव जाधव व शिवानंद भिमप्पा जाधव, अशी आहेत संशयित आरोपींची नावे 

मयत लक्ष्मीबाई यांच्या पतीचा पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. त्यापैकी एका मुलीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून आता त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ते दोघेही कर्नाटकातील तोरवी येथे राहायला आहे. लक्ष्मीबाई या कुमठे येथील महालक्ष्मी नगरात एकट्याच राहत होत्या. त्यांना मुलीच्या अनैतिक संबंधाबाबत समल्यानंतर लक्ष्मीबाई यांनी मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी काहीच ऐकत नसल्याने त्यांनी मुलगी आणि मुलीच्या दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधाला प्रखर विरोध करायला सुरवात केली. त्याचा राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या सहायाने आईलाच संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपींना दोनच दिवसांत पकडण्यात यश आल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. दोघाही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.