आजारपण अंगावर काढू नका ! रुग्णालयात उशिरा गेलेल्या 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू; आज 24 पॉझिटिव्ह  

31Corona_20akola_2001_1_3.jpg
31Corona_20akola_2001_1_3.jpg
Updated on

सोलापूर : शहरात आज 15 पुरुष आणि नऊ महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत. तर जुना बोरामणी नाका परिसरातील जोशी गल्लीतील 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. 12) तो रुग्ण रात्री बारा वाजता मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा पहाटे साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. तापसदृश्‍य आजार असल्यास न घाबरता डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत एक लाख आठ हजार 890 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 921 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 700 संशयितांमध्ये 24 व्यक्‍ती पॉझिटिव्ह; 46 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू 
  • शहरात उरले आता 446 कोरोना बाधित; आतापर्यंत 551 रुग्णांचा बळी 
  • आतापर्यंत आठ हजार 824 रुग्णांनी केली कोरोनावर मात

शहरात आज रेल्वे लाईन्स, बसवराज निलय नगर (सोरेगाव), शिवगंगा नगर, विशाल नगर (जुळे सोलापूर), गोल्डफिंच पेठ, मोदीखाना, इंडियन मॉडेल स्कूलजवळ, मंजुनाथ नगर (लिमयेवाडी), एमएसईबी कार्यालयाजवळ (जुनी मिलजवळ), बाकळे नगर (शेळगी), विरशैव नगर (विजयपूर रोड), शिक्षक सोसायटी (दक्षिण सदर बझार), सिव्हिल हॉस्पिटलमागे, कोंडा नगर (अक्‍कलकोट रोड), ब्रह्मनाथ नगर (हैदराबाद रोड), धुम्मा वस्ती, शास्त्री नगर, गवळी वस्ती (जुनी मिल चाळजवळ), मनोरमा नगर, बालाजी मंदिराजवळ (न्यू पाच्छा पेठ), ओम नम:शिवाय नगर (कुमठे रोड) आणि जुनी मिल चाळ येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 103 संशयित होम क्‍वारंटाईन असून 45 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या 25 इतकी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com