
अक्कलकोट तालुक्यातील हालहळी अ. या गावात एका बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेची फिर्याद सिद्राम ईराप्पा सावगे (वय 55, रा. विजयपूर नाका, एक नंबर झोपडपट्टी, सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली.
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील हालहळी अ. या गावात एका बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेची फिर्याद सिद्राम ईराप्पा सावगे (वय 55, रा. विजयपूर नाका, एक नंबर झोपडपट्टी, सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव सागर सिद्राम सावगे (वय 22, रा. विजयपूर नाका, एक नंबर झोपडपट्टी, सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर) असे आहे. सागर सिद्राम सावगे या युवकाचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने जाळून जीवे ठार मारले. हा खून 24 जानेवारी दुपारी एक ते 25 जानेवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील हालहळी अ. येथे झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी हे करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल