दोन लाखांवरील कर्जदारांसाठी मोठी बातमी....नक्‍की वाचा 

AJITPAWAR
AJITPAWAR
Updated on

सोलापूर : दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द केली जाणार आहे. मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा संपूर्ण लाभ देण्याचे नियोजन महाविकास आघाडी सरकारने केले आहे. तर दोन लाखांवरील कर्जदारांच्या निर्णयासाठी नियुक्‍त अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात निर्णायक बैठक होणार आहे. खरीप हंगामात थकबाकीदारांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे, या हेतूने ही समिती फेब्रुवारीअखेर अंतिम निर्णय जाहीर करेल, असा विश्‍वास सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. 


महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या सुमारे 29 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने बॅंकांकडून मागवून घेतली आहे. खरीप हंगाम काही महिन्यांवर राहिला असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे यादृष्टीने सरकारने नियोजन केले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) लागू केली करुन त्याअंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून दिले जातील. तत्पूर्वी, त्यांना दोन लाखांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी काही बॅंकांचे व कृषीतज्ज्ञांचे अभिप्रायही या समितीने घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात बैठक होणार असून लवकरच समिती निर्णय जाहीर करेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 


मेपर्यंत मिळणार कर्जमाफीची रक्‍कम 
दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द होईल. मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांच्या लाभासाठी मंत्र्यांची अभ्यास समिती नियुक्‍त केली आहे. समिती आपल्या निर्णयाची शिफारस शासनाला सादर करणार असून त्यानंतर शासन स्तरावरून काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. 
- डॉ. आनंद जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार 

ठळक बाबी... 

  • दोन लाखांवरील कर्जदारांच्या निर्णयासाठी अभ्यास समितीने घेतला कृषीतज्ज्ञांचा अभिप्राय 
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पुढील आठवड्यात निर्णायक बैठक 
  • व्याजामुळे थकबाकी वाढल्याने 'ओटीएस'ची शक्‍यता : समितीच्या शिफारसीनुसार होणार शासन निर्णय 
  • राज्यातील 23 लाख कर्जदारांना मिळणार खरीप हंगामापूर्वी दिलासा 
  • दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची पहिली यादी 15 फेब्रुवारीनंतर : मेपर्यंत मिळणार लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com