श्री विठ्ठल मंदिरात ४० हजार सोनचाफ्यांच्या फुलांनी सजावट

अभय जोशी
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे असले तरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल कथा सुनील जोशी आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जोशी यांच्या आर्थिक सहकार्यातून सोनचाफ्याच्या सुंदर फुलांनी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात तब्बल ४० हजार सोनचाफ्याच्या फुलानी सजावट करण्यात आली आहे. 
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे असले तरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल कथा सुनील जोशी आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जोशी यांच्या आर्थिक सहकार्यातून सोनचाफ्याच्या सुंदर फुलांनी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातून खास त्यासाठी सोनचाफ्याची फुले मागवण्यात आली आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा आणि मंदिर परिसरात ठिकाणी सोनचाफाच्या फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decoration for Gudi Padwa at Vitthal Temple in Pandharpur