‘त्या’ सरपंचाचे म्हणून पद रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत पौट वाळू चोरीप्रकरणी कारवाई करण्यास गेलेल्या हुलजंतीचे मंडलाधिकारी व पौटच्या तलाठी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पौट ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

मंगळवेढा (सोलापूर) : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत पौट वाळू चोरीप्रकरणी कारवाई करण्यास गेलेल्या हुलजंतीचे मंडलाधिकारी व पौटच्या तलाठी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पौट ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की,  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या समितीमध्ये त्याची जबाबदारी त्या गाव कामगार तलाठ्यावर आहे. एका तलाठ्यावर अनेक गावचा पदभार असल्यामुळे सर्व कामे अतिशय जोखमीचे पार पाडली जात असताना अशा परिस्थितीत ओढा व नदी पात्रातून होत असलेली वाळूची चोरी रोखण्यासाठी गस्त घालण्याची जबाबदारी आहे. त्यावर पौट येथे कारवाई करण्यास गेले असता येथील सरपंच राजाराम जगन्नाथ मोरे व त्यांच्या दोन मुलांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा वाळू तस्कर सरपंचाचे पद रद्द केल्यास भविष्यात अवैध व्यवसाय करणारे हल्ला करण्यासाठी धजावणार नाहीत. वाळू तस्करांना सवलत दिल्यास प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून अवैध धंदे भविष्यात वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. निवेदनावर तलाठी संघटनेचे अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, सचिव समाधान वगरे, विजय एकतपुरे,राजाराम रायबान,वंदना गुप्ता,विजयकुमार शिंदे आदीसह इतर तलाठी बांधवाच्या सह्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to cancel the post of Sarpanch in Mangalvedha taluka