सोलापूर शहरात देशी दारू विक्रीला परवानगी द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

महापालिकेच्या हद्दीत राज्य सरकारने व सोलापूर जिल्हा प्रशासनाने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देत असताना सोलापूर महापालिका हद्दीत देशी दारू विक्री करण्यास मात्र बंदी कायम ठेवली आहे. सोलापूर शहरातील देशी दारू विक्री सुरू करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोलापूर : महापालिकेच्या हद्दीत राज्य सरकारने व सोलापूर जिल्हा प्रशासनाने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देत असताना सोलापूर महापालिका हद्दीत देशी दारू विक्री करण्यास मात्र बंदी कायम ठेवली आहे. सोलापूर शहरातील देशी दारू विक्री सुरू करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोलापूर महापालिकेच्या हद्दीत देशी दारू विक्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या दीडशे ते दोनशे आहे. त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची व कामगारांची उपासमार होऊ लागली आहे. देशी दारू विक्रेत्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज व  व्याजाचे हप्ते या रकमा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा आर्थिक व मानसिक ताण देशी दारू विक्रेत्यांवर आला आहे. देशी दारू किरकोळ विक्री दुकानामधील देशी मद्य व  बिअरचा मद्यसाठा फेब्रुवारीमध्ये मिळालेला आहे. देशी दारू पिण्याची मुदत कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. ही दुकाने सुरू न झाल्यास देशी दारूचा व बिअरचा साठा नष्ट करावा लागेल. त्यातून साधारणता दोन-तीन कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान देशी दारू विक्रेत्यांना सहन करावे लागणार आहे. देशी दारू विक्रेते, त्यांच्या दुकानात काम करणारे  कामगार आणि कामगारांवर असलेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.  त्यामुळे देशी दारू विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मध्ये विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे. 
सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सोमेश क्षीरसागर म्हणाले, ठोक विक्रेत्यांकडून 2 ते 3 कोटी रुपयांचे देशी मद्य व बिअर किरकोळ दुकानदारांनी खरेदी करून ठेवले आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी ठोक विक्रेते वारंवार तगादा लावत आहेत. त्यामुळे देशी मद्य विक्रेते व बिअर विक्रेत्यांवर  मानसिक तणा आला आहे. प्रशासनाने यातून सकारात्मक निर्णय घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for permission to sell native liquor in Solapur city