आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या  कर्नाटकातील मजूर महिलांची तहसीलदारांकडे आर्जव 

mask-1.jpg
mask-1.jpg
Updated on

पंढरपूर ः महाराष्ट्र सरकारची आम्हाला काहीही मदत नको, फक्त आम्हाला आमच्या मुलांसाठी घरी जाऊ द्या. दोन दिवस झाले आम्ही मुलांच्या आठवणींनी व्याकूळ झालो आहेत. आमची मुले तिकडे उपाशीपोटी आहेत. त्यामुळे आम्ही दोन दिवसांपासून अन्नाच घास घेतला नाही. तुमचे आम्हाला काही नकोय. आता फक्त आम्हाला घरी सोडा. आम्ही पायी जातो, अशी आर्त हाक कर्नाटकातील मजूर महिलांनी आज पंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्याकडे पाहून मारली. क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या या महिलांची ही आर्जव ऐकून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मन हेलावून गेले. 
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकराने राज्य व जिल्हा सीमा बंद केल्या आहेत. तरीही पुणे येथे मजुरी करणारे कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील 48 मजूर पायी आपल्या घराकडे निघाले होते. 28 मार्च रोजी ते वाखरी (ता. पंढरपूर) येथे विश्रांतीसाठी थांबले असता त्यांना पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना 65 एकर परिसरातील निवारा केंद्रात होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. 
मराठी भाषिक असलेल्या या महिला दोन दिवसांपासून आम्हाला सोडा म्हणून येथे येणाऱ्या प्रत्येकाकडे हात जोडून आणि पदर पसरून विनंती करत आहेत. 
या मजुरांना शहरातील काही स्थानिक संघटनांनी भोजनाची सोय केली होती. परंतु आजपासून पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना चहा, नाश्‍ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तहसीलदार डॉ. वाघमारे दिवसभर थांबून त्यांची व्यवस्था पाहात आहेत. आज दुपारी तहसीलदार या महिलांची विचारपूस आणि त्यांना धीर देण्यासाठी गेल्या असता, या मजूर महिलांनी आमची मुलं तिकड पाखरावानी वाट पाहात असतील हो, आम्हाला तुमचं जेवण नको की पैसेसुद्धा नकोत. फकस्त आमासनी आमच्या घरी सोडा. आमला जायला गाडी पण देऊ नका. आम्ही पायी जातो पण आम्हाला येथून सोडा, अशी विनंती करत आहेत. या लेकुरवाळ्या महिलांची ही आर्जव ऐकून उपस्थितांचे मन हेलावून जात आहे. कोरोनामुळे सगळ्याच लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकारीही काळजावर दगड ठेवून आपली सेवा बजावत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. 

रायचूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू ​
महिलांची तपासणी करून त्यांना 65 एकरमध्ये होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. आम्हाला घरी सोडा म्हणून या महिला विनंती करत आहेत. प्रशासनाच्या वतीने त्यांना चहा, नाश्‍ता, जेवण आणि लहान मुलांसाठी दूध आणि बिस्किटाची सोय केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रायचूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे. 
- डॉ. वैशाली वाघमारे, तहसीलदार, पंढरपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com