सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी डॉ. पंकज जावळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

महापालिकेच्या उपायुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केली. सध्या ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सोलापूर : महापालिकेच्या उपायुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केली. सध्या ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी श्री. जावळे यांनी महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तत्कालीन उपायुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील यांच्या बदलीनंतर महापालिकेतील उपायुक्तपद रिक्त होते. मुख्य लेखा परिक्षक अजयसिंह पवार यांच्याकडे अतिरीक्त पदभार आहे. सोलापूर शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर या साथरोगावर नियंत्रण मिळवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पूर्ण वेळ अधिकारी असावा यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून डॉ. जावळे यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the Deputy Commissioner of Solapur Municipal Corporation Dr Pankaj Jawale