शहरातील दिव्यांगांचे जगणे झाले कठीण ! चार महिने होऊनही मिळेना उदरनिर्वाह भत्ता

तात्या लांडगे
Tuesday, 29 September 2020

कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही मानधन थकले 
कोरोना काळात कुटुंबाची पर्वा न करता कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार ते सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा एक कोटींपर्यंत खर्च होतो. कोविड- 19 च्या काळात स्वत:च्या जीव धोक्‍यात घालून कंत्राटी कर्मचारी ड्यूटी बजावत आहेत. कामयस्वरुपी कर्मचारी, अधिकारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच कामाचा अधिक भार टाकत असल्याची चर्चा आहे. अधिक काम करुनही दरमहा मिळणारे मानधन मिळत नसल्याने त्यांच्यासमोरही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

सोलापूर : शहरात सर्व संवर्गात दोन हजार 30 दिव्यांग आहेत. त्यापैकी 71 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत 781 दिव्यांग असून त्यांना दरमहा सहाशे ते एक हजार रुपयांचा महापालिकेकडून उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. त्यात कर्णबधीर 152, दृष्टीहिन 203, अस्थिव्यंग 176, मूकबधीर 59, मतिमंद 228 लाभार्थी आहेत. कोरोना काळात त्यांना दरमहा उदरनिर्वाह भत्ता मिळणे अपेक्षित आहे. पण, महापालिकेकडून तो त्यांना दिला जात नसल्याचे समोर आले आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर 2019 पर्यंत 590 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपये दरमहा मिळायला हवेत. मात्र, दरमहा हा निधी न देता चार-सहा महिन्यातून एकदाच वितरीत केला जात आहे. मार्चनंतर या दिव्यांगांना दमडाही मिळाला नाही. महापालिकेच्या बजेटमध्ये यासाठी तदतूद करुनही वेळेत निधी मिळत नसल्याने या दिव्यांगांचे जीणे अधिकच मुश्‍किल झाले आहे. कोरोना काळात कुटुंबांवरील खर्चाचा बोजा वाढल्याने पालकांना या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, कर्मचारी कोरोना ड्यूटीवर असल्याचे कारण सांगून काम टाळण्याचा प्रकार आता महापालिकेत नव्याने रुजू होऊ लागल्याची चर्चा आहे. मार्चनंतर दिव्यांगांना त्यांचा उदरनिर्वाह भत्ता न मिळाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने दिव्यांगांची रक्‍कम तत्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही मानधन थकले 
कोरोना काळात कुटुंबाची पर्वा न करता कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार ते सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा एक कोटींपर्यंत खर्च होतो. कोविड- 19 च्या काळात स्वत:च्या जीव धोक्‍यात घालून कंत्राटी कर्मचारी ड्यूटी बजावत आहेत. कामयस्वरुपी कर्मचारी, अधिकारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच कामाचा अधिक भार टाकत असल्याची चर्चा आहे. अधिक काम करुनही दरमहा मिळणारे मानधन मिळत नसल्याने त्यांच्यासमोरही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite making provision for this in the solapur municipal budget, it has become more difficult for these cripples to survive due to non-availability of funds in time