कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील प्रशासनाने खरबदारी घेतली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या सर्व भाविकांची येथील उपजिल्हा रुग्णालायत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यासाठी येथील वैद्यकीय विभागाने खास तयारी देखील केली आहे. आवश्यकता भासल्यास या सर्वांचे विलगीकरण देखील केले जाईल असेही ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर (सोलापूर) : रामकथेसाठी अयोध्येला गेलेले 185 भाविक आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. पंढरपूर आल्यानंतर त्यांना थेट येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर परिसरातील सुमारे 185 भाविक उत्तर प्रदेशातील काशी, अयोध्या आणि मध्यप्रेदशातील चित्रकूट येथे देवदर्शन आणि रामकथेच्या कार्यक्रमासाठी 12 मार्चला गेले होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील अहलाबाद रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते. याची माहिती मिळताच येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी तत्काळ दखल घेवून या सर्व भाविकांना पंढरपुरात परत येण्यासाठी चार खासगी बसची व्यवस्था केली आहे. हे सर्व भाविक खासगी बसने पंढरपूरकडे सोमवारी (ता. 23) रात्रीच मार्गस्थ झाले आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत ते पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.