कोरोनाने नव्हे; जिल्हा बंदीने घेतला एकाच जीव

राजाराम माने
Thursday, 26 March 2020

कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केल्यानंतर राज्यात सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. जिल्ह्याला जोडणारे रस्ते प्रशासनाने बंद केले. त्यातच सोलापूर- पुणे जिल्ह्याला जोडणारा डिकसळ (ता. इंदापूर) हा कोंढारचिंचोली (ता. करमाळा) जवळील जुना रेल्वे पूल (सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार) रस्त्यावर मुरूम, दगड, गोटे टाकून, रस्ता खोदून बंद करण्यात आला होता.

केतूर (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागु केली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या सीमा ही सील केल्या आहेत. मात्र, यातून करमाळा तालकु्यात एकाचा जीव गेला आहे. 
कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केल्यानंतर राज्यात सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. जिल्ह्याला जोडणारे रस्ते प्रशासनाने बंद केले. त्यातच सोलापूर- पुणे जिल्ह्याला जोडणारा डिकसळ (ता. इंदापूर) हा कोंढारचिंचोली (ता. करमाळा) जवळील जुना रेल्वे पूल (सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार) रस्त्यावर मुरूम, दगड, गोटे टाकून, रस्ता खोदून बंद करण्यात आला होता. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने कोंढारचिंचोली (ता. करमाळा) येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
कोंढारचिंचोली (ता. करमाळा) येथील शिवाजी सोपान डफळे (वय ७०) यांना दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी भिगवण येथे न्यायचे होते. परंतु जिल्हाबंदी असल्याने त्यांना जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने डिकसळच्या पुलावरून उपचारासाठी भिगवण येथे लवकर वेळेवर नेता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाचा असाही बळी अशी चर्चा मात्र परिसरात सुरू होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर सायंकाळी सहा वाजता कोंढार चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dies due to lack of timely treatment in Solapur district