करमाळ्यातील बागल गटात उत्साहाचे वातावरण; दिग्विजय यांचे संचालकपद कायम 

Digvijay Bagal remains the director of the karmala market committee
Digvijay Bagal remains the director of the karmala market committee
Updated on

करमाळा (सोलापूर) : बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद कायम ठेवण्याचा निर्णय पणन आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या टोकाचे राजकारण सुरू आहे. यात दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम राहिल्याने बागल गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
मंगळवारी (ता. 16) झालेल्या सुनावणीच्या वेळी पणन आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिग्विजय बागल यांचे संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाने बागल गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिग्विजय बागल यांच्या पत्नी प्रियांका दिग्विजय बागल या व्यापारी परवानाधारक असल्यामुळे दिग्विजय बागल यांचे अधिकृत संचालकपद रद्द करण्यासाठी शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी पणन संचालक यांच्याकडे अर्ज केला होता. 
जगताप यांच्या अर्जानुसार पणन संचालकनी दिग्विजय बागल यांचे 18 जुलै 2019 रोजी संचालकपद रद्द केले होते. याबाबत दिग्विजय बागल यांनी पणनमंत्री यांच्याकडे अपील केले होते. याविषयी मंगळवारी झालेल्या सुनावणीत पणन आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शंभूराजे जगताप यांचे मुद्दे फेटाळत दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम ठेवले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम राहिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बागल गटाचे वर्चस्व वाढणार आहे. 

बागल गटात उत्साहाचे वातावरण 
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप व त्यांच्या समर्थकांनी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्याशी हाणमारी केली होती. याप्रकरणी जयवंतराव जगताप व त्यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत टोकाचे राजकारण सुरू आहे. यातच बागल गट व जगताप गट या दोन्ही गटांनी एकमेकांचे संचालकपद घालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत दिग्विजय बागल यांचे संचालकपद कायम राहिल्याने बागल गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com