
तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात बागल गटाने 16 ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता आणली असल्याचा दावा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे.
करमाळा (सोलापूर) : तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात बागल गटाने 16 ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता आणली असल्याचा दावा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दिग्विजय बागल यांनी सांगितले, की ग्रामपंचायतींच्या निकालाची आम्ही आकडेवारीसह सांगतो. यामध्ये पोथरे -9 जागा, देवळाली- 7 जागा, मांगी- 5 जागा, हिवरवाडी- 4 जागा, पिंपळवाडी- 7 जागा, शेलगाव (क)- 7 जागा, सौंदे- 4 जागा, गुळसडी- 9 जागा, शेटफळ (ना)- 6 जागा, श्रीदेवीचामाळ- 5 जागा, पाडळी- 6 जागा, बाळेवाडी- 6 जागा, निमगाव (ह)- 4 जागा, हिवरे- 4 जागा, बिटरगाव (श्री) - 5, भोसे - 5 जागा या सर्व ग्रामपंचायती बागल गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
तर बागल - पाटील - इतर युतीतून आळसुंदे बागल गट - 3 जागा, कुगाव बागल गट- 4, केडगाव बागल- 3 जागा, कविटगाव, सरपडोह, कुंभेज बागल गट- 3, आळजापूर- बागल गट 4, जातेगाव, पोटेगाव - बागल गट 5, नेरले- बागल गट 3, मिरगव्हाण - बागल गट 3, वडगाव- बागल गट 4 या ग्रामपंचायती युतीच्या माध्यामातून बागल गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आणल्या आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांबाबत बागल गट आज तालुक्यात प्रथम आहे. विरोधी गटाला जास्त काही हाती न लागल्यामुळे आकडेवारी फुगवून सांगत आहेत. बागल गटावरील लोकांचे प्रेम कोठेच कमी झाले नाही, हे या निवडणुकीतून दिसत आहे. आपण स्वतः लक्ष देऊन निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायतींना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणून देऊ.
तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर बागल गटाने एकहाती सत्ता आणली. करमाळा शहरालगतच्या सर्व गावांवर बागल गटाने सत्ता अबाधित ठेवली. देवळाली, पांडे, पोथरे, गुळसडी, पांगरे, शेलगाव (क) या मोठ्या ग्रामपंचायतीही बागल गटाने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. कोणतीही आकडेवारी फुगवून न सांगता आम्ही तालुक्यात सरस ठरलो आहोत, हे कार्यकर्त्यांचे यश आहे.
- दिग्विजय बागल,
बागल गटाचे नेते
संपादन : श्रीनिवास दुध्याल