ब्रेकिंग ! जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप माने यांचे नाव निश्‍चित

प्रमोद बोडके 
Wednesday, 2 September 2020

सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झाली असून, या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक उपस्थित होते. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा मार्ग न्यायालयातून मोकळा झाल्यानंतर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव एकमताने निश्‍चित करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात झाली असून, या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक उपस्थित होते. आपल्याला कामाचा व्याप असल्याने आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे आमदार संजय शिंदे यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. माजी आमदार माने यांचे नाव एकमताने निश्‍चित झाले असून, दुपारी अडीच वाजता अध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Manes name has been finalized for the post of District Milk Association President