कोरोना : मंगळवेढ्यातील नागरिकांना लागली शिस्त

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 26 मार्च 2020

दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी वैद्यकीय व किराणा व्यवसाय यांची बैठक घेऊन त्यांची यादी व त्यांचे व्हाट्सअँप क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक असलेल्या मालाची सुविध दुकानासमोर गर्दी न करता घरपोच देण्याच्या संदर्भात सूचना दिल्या.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी केलेली कारवाई आणि गर्दी टाळण्यासाठी केलेले नियोजन यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे शहरात व ग्रामीण भागात आता शिस्तीचे दर्शन घडू लागले.
दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी वैद्यकीय व किराणा व्यवसाय यांची बैठक घेऊन त्यांची यादी व त्यांचे व्हाट्सअँप क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक असलेल्या मालाची सुविध दुकानासमोर गर्दी न करता घरपोच देण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. शहरात भाजीपाला विक्रेते 27, फळविक्रेते 22, वैद्यकीय व्यवसायीक 37, किराणा व्यवसायिक 75 असून त्याची यादी सोशलमिडीयात दिली आहे. खरेदीसाठी दिवसातून वेळा निश्चित केल्या. याचा बोध ग्रामीण भागातही घेतला गेला. पोलिसांनी दुकानासमोर गर्दी केल्याप्रकरणी दुकानदारावर कारवाई केली, तर चौकात रिकाम टेकडे गप्पा मारणाऱ्यावर कारवाई केली. मोटरसायकलस्वारावर लाठीचार्ज केला. दोन दिवसात तब्बल 76 लोकांवर कारवाई करून पन्नास हजारपेक्षा अधिक दंड वसुली केली. त्यामुळे शासनाने केलेले आवाहन यामुळे शहरात मात्र शांतता पसरली, अशा परिस्थितीत नगरपालिकेने देखील स्वच्छता मोहीम राबवली तर  नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये रोगाचा अटकाव करण्यासाठी प्रबोधन करत प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे साहित्याचे वाटप देखील केले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत जनतेने कुठल्याही अफवांना बळी न पडता पूर्ण रोगाचा सामना करण्यासाठी घरी बसावे, रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केलेलाल असा इशाराही दिला. त्यामुळे आज मंगळवेढामध्ये किराणा बाजार आणि भाजीपाला खरेदी करताना लोकांमध्ये शिस्तीचे दर्शन दिसून आले. आता हीच परिस्थिती 14 एप्रिल पर्यंत कायम ठेवल्यास मंगळवेढा शहर व तालुक्यामध्ये प्रवेश करणार नाही एवढे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The discipline of the citizens of Manglvedha