मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटतोय ! आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांबरोबरची चर्चा निष्फळ 

भारत नागणे 
Friday, 6 November 2020

मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटू लागला आहे. पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटू लागला आहे. पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

संचारबंदीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि मराठा समन्वयकांची उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बैठक झाली. ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. आज दुपारी पुन्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, उद्या (शनिवारी) श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन आक्रोश मोर्चा मंत्रालयाच्या मार्गस्थ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

सरकार मराठा समाजाला घाबरत असल्यानेच मोर्चा हाणून पाडला जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, महेश लांडगे, धनंजय साखळकर यांनी केला आहे. 

बैठकीला किरण घाडगे, अर्जुन चव्हाण, संदीप मांडवे, रामभाऊ गायकवाड, संदीप मुटकुळे आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion of Maratha community coordinators with district superintendent of police failed