करमाळा तालुक्यात खडकीत रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटप

अण्णा काळे
गुरुवार, 18 जून 2020

खडकी येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर डॉ. अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून नागरिकांना रोग प्रतीकार शक्ती वर्धक होमिओपँथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

करमाळा (सोलापूर) : खडकी येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर डॉ. अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून नागरिकांना रोग प्रतीकार शक्ती वर्धक होमिओपँथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.  यात आपल्याकडून नागरिकांना थोडीफार मदत व्हावी म्हणून डॉ. शिंदे यांनी पुढकार घेऊन खडकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खडकी गावातील 300 कुटुबांना रोग प्रतिकारशक्तीच्या गोळ्यांचे वाटप केले. खडकीसह जातेगाव येथील चेक पोस्टवर असलेल्या पोलिस आधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी गोळ्यांचे वाटप केले. या गोळ्यांचे वाटप करताना सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनावर अद्याप ठोस उपाय निघालेला नाही. लस निघेपर्यत पर्यायी म्हणून अर्सिनिक अल्बम थर्टी हे औषध होमिओपँथिकचे रोगप्रतिकार शक्ती वर्धक म्हणून वापर करावा असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिस, डाँक्टर, कर्मचारी, नागरीक व शेतकरी जिव धोक्यात घालुन कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे आरोग्य चांगले राहवे व रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून गोळ्या वाटप केल्या आहेत. गरज नसताना घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, घरामध्ये राहा. आपल्या कुटुबांची काळजी घ्या, सरकारने दिलेल्या नियमांचे व सुचनांचे पालन करा व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. गोळ्या वाटपवेळी खडकीचे सरपंच बळीराम शिंदे, चेअरमन उमाकांत बरडे, उपसरपंच किसन काकडे, ग्रामसेविका आर. एन. उंडे, भाजपचे मोहन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, भाऊसाहेब मोरे, अरूण नागटिळक उपस्थित होते.  बंडु शिंदे, भाऊसाहेब शिंदे, सुरज बरडे, दिलीप नागटिळक, गणेश गोसावी, सचिन शिंदे, जितु शिंदे, पिनु कुलकर्णी, ईश्वर खरात, बापु देशमुख, अनिल गरड, संजय काटकर यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Immunity Pills in Karmala taluka under the initiative of doctor Ashok Shinde