कृषी विधेयकामार्फत शेती व शेतकरी मोडीत काढण्याचा प्रयत्न : जिल्हा युवक कॉंग्रेसचे पंढरपुरात आंदोलन 

Pdr Congress
Pdr Congress
Updated on: 

पंढरपूर (सोलापूर) : केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित कृषी विधेयकाच्या विरोधात आज सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने गाढवाच्या गळ्यात नरेंद्र मोदींचा फोटो अडकवून आंदोलन करण्यात आले. 

शेती सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाच्या विरोधात देशभरात शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. यामध्ये आता कॉंग्रेसनेही उडी घेत मोदी सरकारच्या या सुधारित शेती विधेयकाच्या विरोधात आंदोलन पुकारले आले. या विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रातही जिल्हा युवक कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. पंढरपुरातही आज सकाळी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन रोडवर सुधारित कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 

या वेळी संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि विधेयकाची प्रत गाढवाच्या गळ्यात बांधून आंदोलन केले. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने शेती आणि शेतकरी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदींनी सुधारित कृषी विधेयक आणून देशातील कृषी बाजारपेठच मोडीत काढली आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू. येत्या आठ दिवसांत केंद्र सरकारने फेरविचार करून विधेयक मागे घ्यावे; अन्यथा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला आहे. 

आंदोलनामध्ये संदीप शिंदे, सोमनाथ आरे, कृष्णा कवडे, समाधान पोळ, विशाल बोडके, सोमनाथ क्षीरसागर, संदीप गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhalevadi Rural Tourism and Millet Experience
Maharashtra farmer loan waiver latest news
Solapur Shiv Sena Unveils Jumbo Social Media Committee; 253 Office Bearers Appointed!
Chetansinh Kedar Sawant
Marathi News Esakal
www.esakal.com