esakal | पापरी सोसायटी तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना लाभांश वाटप

बोलून बातमी शोधा

Dividends were distributed to the members on the backdrop of Diwali by the Papari Society at Papari in Mohol taluka.jpg

संस्थेने सभासदाकडील कर्जाची शंभर टक्के वसुली केल्याने संस्थेला चालू वर्षी लाभांश वाटपाची परवानगी मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश भोसले यांनी दिली. यामुळे सभासदांची दिवाळी गोड झाली आहे.

पापरी सोसायटी तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना लाभांश वाटप
sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील पापरी येथील पापरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी क्र. एक या संस्थेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना १० टक्के प्रमाणे चार लाख 58 हजार रुपये लाभांश वाटप केला आहे. संस्थेने सभासदाकडील कर्जाची शंभर टक्के वसुली केल्याने संस्थेला चालू वर्षी लाभांश वाटपाची परवानगी मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश भोसले यांनी दिली. यामुळे सभासदांची दिवाळी गोड झाली आहे.

माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर असून संस्थेचे एकूण 490 सभासद आहेत. संस्थेची एक कोटी 12 लाख रुपयांची मुदत ठेव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सोसायटीकडे ३० लाख रुपयाचे कर्ज आहे तर सोसायटीने सभासदांना जुने-नवे मिळून 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी संस्थेने दीड वर्षापासून जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू केली असून, पाणी विक्रीच्या माध्यमातून एक लाख तीस हजार रुपये संकलित झाले आहेत तर एका मजुराला रोजगार उपलब्ध झाला आहे.

केवळ आर्थिक उलाढाल हा दृष्टिकोन न ठेवता संस्थेने पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम राबवला आहे. यापूर्वी सभासदांना नामांकित वाणाच्या आंबा रोपाचे वाटप केले होते. यावेळी सतीश भोसले, यांच्यासह सचिव श्रीकांत घोंगडे, सहसचिव सुलतान मुलाणी, अजीत भोसले, अंकुश च०हाण, युवराज भोसले उपस्थित होते.


संपादन - सुस्मिता वडतिले