महाशिवरात्रीच्या उपवासाला आरोग्यासाठी असा करा आहार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

महाशिवारात्रीचा शुक्रावारी अनेकांना उपवास असतो. यामुळे घरामध्ये महिलांचे दिवसभरात उपवासाला खाण्यासाठी काय करायचे याचे नियोजन सुरु असते. सकाळी काय करायचे, दुपारी काय असणार तर संध्याकाळी पुन्हा काय करायचे? असा नियोजन असते. असेच नियोजन सुरु असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल.... 
उपवासाला अतितेलकट, अतिजड पदार्थ खाऊन म्हणजेच पदार्थांचे अतिसेवन करून पोट बिघडण्याची शक्यता असते.

सोलापूर : महाशिवारात्रीचा शुक्रावारी अनेकांना उपवास असतो. यामुळे घरामध्ये महिलांचे दिवसभरात उपवासाला खाण्यासाठी काय करायचे याचे नियोजन सुरु असते. सकाळी काय करायचे, दुपारी काय असणार तर संध्याकाळी पुन्हा काय करायचे? असा नियोजन असते. असेच नियोजन सुरु असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल.... 
उपवासाला अतितेलकट, अतिजड पदार्थ खाऊन म्हणजेच पदार्थांचे अतिसेवन करून पोट बिघडण्याची शक्यता असते. याउलट काहीजण निर्जळी उपवास करु पाहतात आणि अॅसिडीटीला आमंत्रण देतात. म्हणूनच उपवासाला प्रमाणात कसे आणि काय खावे याला खूप महत्त्व आहे.

उपवास दिवशी नेहमीपेक्षा थोडं कमी सात्विक पदार्थ खावे आणि उपवास म्हणजे आध्यात्मिक गोष्टींच्या अधिकाधिक सान्निध्यात रहावे, असे अपेक्षित असते. काही उपवास दुसऱ्या दिवशीच सोडले जातात. हरितालिका आणि महाशिवरात्री या दोन दिवसांचा यात समावेश होतो.
काही ठिकाणी तर महाशिवरात्रीचा दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी गोडधोड पदार्थ करुन उपवास सोडला जातो.
अहार तज्ज्ञांच्या मते...
- उपवासाच्या दिवशी जे खायचे आहे ते कमी प्रमाणात खावे, याबरोबर पचायला हलके पदार्थ असतील ते खावेत.

- उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. महाशिवरात्रीदिवशी उन्ह असते. त्यामुळे तळलेले पदार्थ खशणे टाळलेले चाहगले.

- महाशिवरात्री दिवशी अनेक कुटुंबात शक्यतो सर्वांनाच उपवास असतात. त्यामुळे साबुदाणा खिचडी केली जातो. त्या ऐवजी साबुदाण्याची खीर करावी. अन्यथा साबुदाणा- बटाटा थालीपीठ कमी तेलावर करावे. हे पदार्थ साबुदाणा वड्यापेक्षा पचायला हलके आहेत.
- भरपूर फळं खाणं कधीही चांगलंच. उपवासाच्या दिवशी तेलकट वेफर्स, साबुदाणा वड्यांपेक्षा एखादं फळ खावं.
- उपवसा दिवशी अधूनमधून ताक प्यावे. उन्हाळ्यात ताकामुळे शरीरात थंडावा राहील.
- रताळं पचायला हलकं असते. त्यात खनिजांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बटाट्याच्या तुलनेत रताळ्याला प्राधान्य द्यावं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do this for the health of the fast of Mahashivratri