तुमच्या मोबाईलमध्ये हे धोकादायक ॲप्स आहेत का?

Do you have these dangerous apps on your mobile
Do you have these dangerous apps on your mobile

सोलापूर : स्मार्टफोनमध्ये अनेकजण वेगवेगळे ॲप्स सध्या वापरतात. त्यातील काही ॲपचा तर वापर कसा करायचा याची सुद्धा माहिती काहींना नसते. मात्र तरी सुद्धा ते ॲप मोबाईलमध्ये ठेवले जातात. त्यामुळे मोबाईलमधील स्पेस तर जातेच शिवाय काही ॲप तर धोक्याचे सुद्धा असतात. काही ॲप सुरु केल्यानंतर नको ते मेसेज येतात. त्यामुळेही मोबाईल वापर करता हैराण होतो. मात्र, असेच धोकादायक ॲप गुगल ने प्ले स्टोरमधून हटवले आहेत. तुमच्याही मोबाईलमध्ये असतील तर ते धोक्याचे आहे.
गुगलच्या प्ले स्टोअर मध्ये असंख्य ॲप्स उपलब्ध आहेत. मोबाईल फोनमध्ये सर्व ॲप्स डाऊनलोड करणे अगदी सोपे आहे. मात्र ते ॲप इंस्टॉल करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण प्लेस्टोरवरील अनेक ॲप्स धोकेदायक असल्याचे समोर आले आहे. त्यातील धोकादायक व्हायरसमुळे गुगलने प्ले स्टोअरकरुन ते काढून टाकले आहेत. अशा 24 धोकादायक ॲप्समध्ये व्हायरस असल्याची माहिती असून गुगल प्ले स्टोर वरून ते हटवले आहेत. सायबर सिक्युरिटी वेबसाईट व्हीपीएनआरओ ने या ॲप्सची माहिती दिली होती.

हे आहेत काढून टाकलेले ॲप्स
1-World Zoo, 2-Puzzle Box, 3-Word Crossy!, 4-Soccer Pinbal, 5-Dig it, 6-Laser Break, 7-Word Crush, 8-Music Roam, 9-File Manager, 10-Sound Recorder, 11-Joy Launcher,
12-Turbo Browser, 13-Weather Forecast, 14-Calendar Lite, 15-Candy Selfie Camera,
16-Private Browser, 17-Super Cleaner, 18-Super Battery, 19-Virus Cleaner 2019,
20-Hi Security 2019, 21-Hi VPN, Free VPN, 22-Hi VPN Pro, 23-Net Master,
24-Candy Gallery 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com