esakal | तुम्हाला माहितीय का? जिल्ह्यातील 'ही' 73 गावे कोरोनाच्या संकटातही राहिली सुरक्षित

बोलून बातमी शोधा

002Child_Mask_0_2.jpg

आतापर्यंत शहरात 19 हजार 355 जणांना तर ग्रामीणमधील 51 हजार 870 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील काही मोजके परिसर वगळता सर्वच भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागातील 11 तालुक्‍यांपैकी माळशिरस वगळता उर्वरित तालुक्‍यांमधील 73 गावे कोरोनापासून सुरक्षित आहेत.

तुम्हाला माहितीय का? जिल्ह्यातील 'ही' 73 गावे कोरोनाच्या संकटातही राहिली सुरक्षित
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना सोलापुरात येऊन एक वर्षाचा कालावधी उद्या (सोमवारी) पूर्ण होत आहे. आतापर्यंत शहरात 19 हजार 355 जणांना तर ग्रामीणमधील 51 हजार 870 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील काही मोजके परिसर वगळता सर्वच भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागातील 11 तालुक्‍यांपैकी माळशिरस वगळता उर्वरित तालुक्‍यांमधील 73 गावे कोरोनापासून सुरक्षित आहेत.

ठळक बाबी... 

 • 11 तालुक्‍यांत वर्षभरात आढळले 51 हजार 870 कोरोनाचे रूग्ण 
 • अक्‍कलकोट तालुक्‍यात 1497 तर बार्शीत नऊ हजार 699 आणि करमाळ्यात आढळले 4225 रुग्ण 
 • दक्षिण सोलापुरात आढळले 1922 रुग्ण, मंगळवेढ्यात 2294 तर मोहोळमध्ये 2437 रुग्ण 
 • उत्तर सोलापुरात 1089 तर पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 9943 आणि सांगोल्यात आढळले 3785 रूग्ण 
 • माळशिरस तालुक्‍यात आढळले 9166 रूग्ण; तालुक्‍यातील सर्वच गावांत पोहचला कोरोना 
 • ग्रामीण भागात आतापर्यंत एक हजार 291 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू 


कोरोना होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा त्रिसुत्रीतून जिल्ह्यातील 73 गावांमध्ये कोरोना पोहचलेला नाही. जिल्ह्यात जवळपास एक हजार 88 गावे असून त्यातील एक हजार 15 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पंढरपूर, बार्शी, माळशिरस या तीन तालुक्‍यांच कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झाला. कोरोनाचे संकट दूर करण्याच्या हेतूने तथा कोरोनाचे संकट गावापर्यंत पोहचणार नाही, याची दक्षता त्या 73 गावांमधील लोकप्रतिनिधींसह गावकऱ्यांनी घेतली. उत्तर सोलापूर तालुक्‍यात 36 गावे असून त्यातील भागाईवाडी हे एकमेव गाव असे आहे की, त्या गावात आतापर्यंत एकही रूग्ण आढळला नाही. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन तर गावकऱ्यांची जागृती केल्याने हे शक्‍य झाल्याचे तत्कालीन सरपंच कविता घोडके-पाटील यांनी सांगितले. सुरवातीपासूनच कोरोनाचा धोका आणि कोरोनामुळे होणारे नुकसान लोकांपर्यंत घरोघरी, सोशल मिडियातून पटवून दिले. विविध सणानिमित्त वस्तू स्वरूपात मदत करण्याऐवजी सॅनिटायझर, साबण, मास्क, रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविणाऱ्या गोळ्यांची घरोघरी मदत केली. तालुका पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सॅनिटायझरची मदत केली. लोकांनी त्याला प्रतिसाद देत नियमांचे पालन केल्यानेच हे शक्‍य झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

'या' गावांमध्ये पोहचला नाही कोरोना 

 • दक्षिण सोलापूर : वडगाव, गंगेवाडी, उळेवाडी, चिंचपूर, बाळगी, पिंजारवाडी 
 • उत्तर सोलापूर : भागाईवाडी
 • मंगळवेढा : शिवणगी, माळेवाडी 
 • माळशिरस : 000 
 • करमाळा : म्हसेवाडी, गुलमोहोरवाडी 
 • सांगोला : गावडेवाडी, गुनापवाडी 
 • पंढरपूर : सुगाव खेड, जाधववाडी, खरातवाडी, नळी, पटकुरोली पटर्वधन 
 • बार्शी : येमाई तांडा, भानसाळे, आंबेगाव, भांडेगाव, चिंचखोपन, पिंपळगाव, वाघाचीवाडी 
 • मोहोळ : सिध्देवाडी, कुरणवाडी, भोयरे, मनगोळी, भैरवाडी, दाईंगडेवाडी, नांदगाव, मुंडेवाडी, तरटगाव, शिरापूर मो., जामगाव खुर्द 
 • माढा : हरकरवाडी, चव्हाणवाडी, जामगाव, महदिववाडी, लोणी, शिंदेवाडी, जाधववाडी, खैरेवाडी, अंजनगावा खे., वडाचीवाडी बु., गारअकोले 
 • अक्‍कलकोट : आंदेवाडी (ज), बिंजगेर, चिक्‍केहळ्ळी, धारसंग, डोंबरजवळगे, हिळ्ळी, इटगे, जकापूर, कुमठे, कोळीबेट, काळेगाव, मराठेवाडी, ममदाबाद, महालक्ष्मी नगर, म्हेत्रे लमाणतांडा, नागोरे, परमानंद नगर, रामपुर, सेवालाल नगर, शिरवळवाडी, शिरसी, सातनदुधनी, सेवानगर, सोळसे लमाणतांडा, विजयनगर, वसंत नाईक नगर