2lockdown_67.jpg
2lockdown_67.jpg

लॉकडाउन कसा होतो माहितीय? दररोजचे पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्येवर अवलंबून सोलापुरचा निर्णय

सोलापूर : शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या अडीचशेपर्यंत आलेली असताना आता त्यात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. सद्यस्थितीत शहरातील एक हजार 322 रुग्णांवर उपचार सुरु असून मागील 20 दिवसांत पाचशेहून अधिक रुग्ण वाढले आहेत. शहरातील रुग्णसंख्येने 14 हजारांचा टप्पा ओलांडला असून मृतांची संख्याही सातशेकडे वाटचाल करत आहे. आज शहरातील तिघांचा मृत्यू झाला असून 153 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 42 हजार 835 जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून एक हजार 211 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 153 पॉझिटिव्ह आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या सोलापूर शहर-जिल्ह्याला पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने घेऊन जात आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करायलाच हवे. शहरात आज दिशा कॉक्रेडजवळ, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, जीएसटी कार्यालयाजवळ, विशाल नगर, नरेंद्र नगर, इंदिरा नगर, नेहरू नगर, व्यास बिल्डिंग, अमृत नगर, आत्मविश्‍वास नगर, राजस्व नगर (विजयपूर रोड), कर्णिक नगर, उत्कर्ष नगर, गणेश नगर, राघवेंद्र नगर, जुना संतोष नगर, प्रेम नगर, वामन नगर, लक्ष्मी नगर, अभिषेक नगर, संतोष नगर (जुळे सोलापूर), नवी पेठ, शिवाजी नगर (मोदी), पूर्व मंगळवार पेठ, किसान नगर, थोबडे वस्ती, जुनी लक्ष्मी चाळ (डोणगाव रोड), बाळीवेस, मल्लिकार्जून नगर, विडी घरकूल, आयोध्या नगर (एसआरपी कॅम्पजवळ), एलबीटी कार्यालयाजवळ, सुजा कॉम्प्लेक्‍स (सैफूल), इंदिरा नगर, मोदी (हुडको), रेसिडेन्सी क्‍वॉर्टरस, शांती नगर, नुतन नगर (कुमठा नाका), महावीर सोसायटी (नेहरू नगर), सुधान कॉम्प्लेक्‍स (होटगी रोड), अल्ले नगर (वसंत विहार), वर्धमान नगर, प्रशांती अपार्टमेंट (सात रस्ता), चिंच नगर (निराळे वस्ती), बॅंक कॉलनी (ज्ञानेश्‍वर नगर), सोनी सिटी (लक्ष्मी पेठ), उंब्रजकर वाडी (मुरारजी पेठ), आदित्य नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), बुधवार पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, अभिषेक नगर (अवंती नगर), इंद्रधनू अपार्टमेंट, गोंधळे वस्ती (मार्केट यार्डामागे), दत्त नगर (दाजी गणपतीजवळ), सात रस्ता परिसर, जोडभावी पेठ, चाटी गल्ली (उत्तर कसबा), गुरुनानक नगर, रेल्वे लाईन (मिहीर अपार्टमेंट), दक्षिण सदर बझार, मारुती गल्ली, खडक गल्ली (बाळे), सलगर वस्ती (डोणगाव रोड), विद्या नगर (सदर बझार), स्वामी विवेकानंद नगर, गुरुनाथ नगर, अंबरकर कॉम्प्लेक्‍स (उत्तर सदर बझार), न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), जुनी मिल कपांउंडजवळ, तेलंगी पाच्छा पेठ, कल्याण अपार्टमेंट, बालाजी हौसिंग सोसायटी (होटगी रोड), कृष्णा पार्क (आदित्य नगर परिसर), रेल्वे लाईन्स, मसरे गल्ली, दक्षिण कसबा, भाग्यलक्ष्मी पार्क (आयएमएस शाळेजवळ), गुरुनानक नगर, गांधी नगर, अशोक चौक, सिध्देश्‍वर कारखान्याजवळ, जीवन नगर (नेताजी शाळेजवळ), सुशिल नगर भाग-दोन, सागर गॅस गोडावूनजवळ (आसरा), महालक्ष्मी नगर (इंदिरा नगर), दमाणी नगर (मरिआई चौक), गणेश नगर, दमाणी नगर, शास्त्री नगर, साखरपेठ, चौपाड, मुस्लिम पाच्छा पेठ, एम्प्लॉयमेंट चौक, युनायटेड विहीर (जुनी पोलिस लाईन), अबोली अपार्टमेंट (लष्कर), साईनाथ नगर (नई जिंदगी), सिध्देश्‍वर हौसिंग सोसायटी, आदर्श नगर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी, भैय्या चौक, सम्राट चौक, मौलाली चौक, श्रध्दा एम्पायर (रेल्वे लाईन), कोणार्क नगर, पुना रोड, पद्मनगर या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com