Rose day : रंगीबेरंगी गुलाबांचे हे महत्त्व तुम्हाला माहितीये का?

अशोक मुरूमकर
Wednesday, 12 February 2020

प्रियकर- प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील रोज डेचा एक वेगळच महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते.

सोलापूर : फेब्रुवारी सुरु झाला की तरुणाईला वेध लागतात ते व्हेलेंटाईन डेचे. १४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे सुरु होत असला तरी त्याआधी वेगवेगळे डे तरुणाई साजरा करते. त्यातला पहिला डे म्हणजे रोज डे. ७ फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले जाते. 
प्रियकर- प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील रोज डेचा एक वेगळच महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्याला भेटण्यासाठी जाताना वेगवेगळी फूल देतात? फुल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? प्रत्येक रंगाच्या गुलाबातून वेगळा संदेश दिला जातो. यातूनच रंगीबिरंगी गुलाबांसोबत रोज डे साजरा केला जातो.
पांढरा गुलाब : पांढऱ्या रंगाचे गुलाब देऊन काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत आदिनाथ जाधव म्हणला, ‘लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश पांढरा गुलाब देऊन दिला देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानला जातो.’ त्यामुळे पांढरे फुल दिले जाते.
लाल गुलाब : लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जते. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रियकर प्रेयसीला लाल गुलाब देतो. हे 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' हा संदेश प्रियकर गुलाब देऊन देतो. हा रंग प्रेमाचा खरा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. 
पिवळा गुलाब : माझ्याशी मैत्री करशील काय? हेच जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र व मैत्रीण होतात आणि कायमस्वरूपी राहशील. तुम्ही अनोळखी व्यक्तीला हा गुलाब भेट दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.
गुलाबी गुलाब : गुलाबी हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर त्याला या रंगाचा गुलाब भेट देऊ शकतात. तू मला आवडतोस हा संकेत गुलाबी गुलाब देते. त्यामुळे अनेकजण हा गुलाब देऊन मनातील भावना व्यक्त करतात.
अशा पद्धतीने प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील प्रेम प्रदर्शित करतो. या प्रकारे काही फुले निवडून तुम्ही तुमचा रोज डे साजरा करू शकता.

असे असणार डे

  • रोज डे
  • प्रपोज डे
  • चॉकलेट डे
  • प्रोमिस डे
  • हग डे
  • किस डे
  • व्हेलेंटाईन डे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know the importance of colorful roses