आमदार प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीत डॉक्‍टरांचा कॉंग्रेस प्रवेश ! सोशल डिस्टन्सिंग अन्‌ मास्क बाजूला

20201011_215350.jpg
20201011_215350.jpg

सोलापूर : शहर युवक कॉंग्रेस डॉक्‍टर सेलतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर- जिल्ह्यातील काही डॉक्‍टरांचा रविवारी (ता. 11) कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत बहुतांश उपस्थित मान्यवरांनी मास्क बाजूला ठेवल्याचे पहायला मिळाले.

सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने शहर- जिल्ह्यातील काही डॉक्‍टरांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे, युवक कॉंग्रेस डॉक्‍टर सेल अध्यक्ष डॉ. अरमान पटेल, दक्षिण विधानसभा युवकचे अध्यक्ष सैफन शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, शरद गुमटे आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉक्‍टर सेलचे अध्यक्ष अरमान पटेल यांचे कार्य चांगले आहे. कोव्हिड काळात जनतेची त्यांनी खूप सेवा केली आहे. तसेच अंबादास करगुळे, डॉ. अरमान पटेल, सैफन शेख यांच्या प्रयत्नामुळे आज काही डॉक्‍टरांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांनी कॉंग्रेस पक्षावर विश्‍वास ठेऊन प्रवेश केला आहेत. बहुतांश डॉक्‍टर राजकरणापासून अलिप्त असतात. कोरोना संकटात डॉक्‍टर मंडळींनी कोरोना संसर्गाचा धोका असतानाही फ्रंटवर काम करतात. डॉक्‍टरांच्या कोणत्याही अडचणी सांगा, त्या निश्‍चितपणे सोडवू, शासनदरबारी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 

 
'यांनी' केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

डॉ. ऐतेशाम सय्यद, डॉ. राजशेखर घोडके, डॉ. नासिर सय्यद, डॉ. वासिफ जमादार, डॉ. जयकुमार कस्तूरे, डॉ. प्रकाश माळी, डॉ. रमेश लबडे, डॉ. संतोष सुतार, डॉ. गणेश कुलकर्णी यांच्यासह जवळपास पन्नास डॉक्‍टरांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com