हृदयस्पर्शी ! 'त्या' डॉक्टरच्या गर्भवती पत्नीने लिहिले थेट मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र...... 

हृदयस्पर्शी ! 'त्या' डॉक्टरच्या गर्भवती पत्नीने लिहिले थेट मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र...... 
Updated on

सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेलेले माझे डॉक्टर पती डॉ. संतोष गायकवाड हे आजारी पडले. त्यांच्यावर सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये 9 दिवस उपचार करण्यात आले. त्यासाठी दोन लाख 14 हजार रुपयांचा खर्च आला असून तो संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि आमचे पैसे परत मिळावेत, असे पत्र त्यांची गर्भवती पत्नी दिपाली गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांना लिहिले आहे.

कोरोनाच्या महामारी काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने राज्य सरकारने अधिकारी व कर्मऱ्यांचा उत्पन्न कर मार्चमध्ये कपात करण्यात आला आहे. तर एप्रिल महिन्यातील पगारात 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. महागाई भत्ता ही जुलै 2021 पर्यंत दिला जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मे महिन्याच्या पगारातून एक-दोन दिवसांचे वेतन परस्पर कापून घेतले जाणार आहे. तर 50 लाख रुपयांच्या विम्याची घोषणा होऊनही अद्याप आमच्याकडून कोणतीही माहिती तथा कागदपत्रे घेतलेली नाहीत. तर राज्यातील धोरणाचा विकास सोडून या विषाणूला हद्दपार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जिवाचे रान करणाऱ्या डॉक्टरांना दोन हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, त्याचीही कार्यवाही सुरू झालेली नाही. अशा परिस्थितीत आजारी पडलेल्या माझ्या पतींच्या उपचारासाठी दोन लाख 14 हजार रुपयांचा खर्च झाला. त्याची जुळवाजुळव करताना नातेवाईकांकडून उसनवारी करावी लागली. कुटुंबाचा उदरनिर्वाह व वैद्यकीय खर्च वाढल्याने सरकारने तो उपचाराचा झालेला खर्च द्यावा, अशी विनंती ती पत्रातून करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची खंत...
- मार्चमध्ये उत्त्पन्न कर कपात तर एप्रिलमध्ये 25 टक्के पगाराला कात्री 
- महागाई भत्ता जुलै 2021 पर्यत केला बंद; मेच्या पगारातून एक-दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी कपातीचा परस्पर निर्णय
- सात दिवसांचा असणार कामाचा आठवडा; कोरोनाच्या महामारीमध्ये कुणीही किमान दोन महिने सुट्टी मागायची नाही असा अलिखित नियम
- तीन महिन्यांसाठी 50 लाखाचा विमा फक्त जाहीर केला, प्रत्यक्षात मात्र कुणाचीही माहिती, कागदपत्रे घेतलेली नाहीत
- प्रोत्साहन भत्ता डॉक्टरांना दोन हजार रुपये तर आरोग्य कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये देणार, असे पत्र असतानाही अद्याप कार्यवाही नाही
- दोन महिने झाले 2 मास्क दिलेत, एक सॅनिटायझर बॉटल दिली, त्यात उपकेंद्र स्तरावर mpw/anm/अर्धवेळ परिचर यांनी ते वापरायचे
- वर्षानुवर्षांपासून प्रलंबित प्रश्न शिकाऊ काळ, स्थायी- अस्थायी पदे, कालबद्ध, प्रमोशन, अतिरिक्त कार्यभार भत्ता, मेडिकल बिल असे अनेक प्रश्न जैसे थे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com