डॉ. शहा म्हणाले ! परदेशांत रस्त्यांवर पोलिस नसतात; एक हजार किलोमीटर प्रवासानंतरही थकवा येत नाही

तात्या लांडगे
Saturday, 26 September 2020

"यामुळे' आपल्याकडेही वाढेल पर्यटन

  • पर्यटनस्थळी स्वच्छता, टापटीपणा, सुरक्षारक्षक, पार्किंगची असावी सोय
  • नियोजित वेळेत पर्यटन सहल पूर्ण करता यावी म्हणून दर्जेदार खड्डेमुक्‍त रस्त्यांची गरज
  • रस्त्यांत थकवा आल्यास थोडावेळ विश्रांतीची असावी सोय; त्याठिकाणीच जेवणाची असावी सोय
  • समुद्री पर्यटनासह धार्मिक पर्यटनाचे मोठे आर्कषण; त्याठिकाणी स्वच्छतेसह सुरक्षितता महत्वाची
  • पोलिसांची मिळावी वेळेत मदत; वाहतूक कोंडी होणार नाही याची घ्यावी खबरदारी

सोलापूर : अमेरिकेसह अन्य देशांमध्ये पर्यटनाला खूप महत्त्व आहे. तत्पूर्वी, मी काश्‍मीर, अंदमान-निकोबार, गुजरात, झारखंड, बिहार, ओरिसा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, सौराष्ट्र (गिरनार, जुनागढ), महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहिली. मात्र, वाहतुकीची मुबलक साधने, प्रवासातील सुरक्षितता, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, राहण्याची व जेवणाची जागोजागी सोय हा वेगळाच अनुभव परदेशी पर्यटनातून आला. आपल्याकडेही तशी सुविधा दिल्यास देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्‍वास डॉ. शितलकुमार शहा यांनी व्यक्‍त केला.

परदेशात पर्यटनाला गेल्यानंतर त्याठिकाणची शौचालये, स्वच्छतागृहे, कॅन्टीन, ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमधील शिस्त, पार्किंगची सोय, पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, टापटीपपणा आणि चकाचक रस्त्यांमुळे दिवसांतून एक हजार किलोमीटरचा प्रवास करुनही थकवा जाणवला नाही. परदेशातील पर्यटनातील महत्वाची बाब म्हणजे समुद्री पर्यटनाचे आकर्षण होय. समुद्रात मोठमोठ्या जहाझांमध्ये पंचतारांकित हॉटेल तयार केले आहेत. त्याठिकाणी खूप सुविधा मिळतात. तर रस्त्यांवर जागोजागी दिशादर्शक तथा माहितीस्तव फलक लावल्याने पुढील ठिकाणी पोहचण्याचे नियोजन करण्यास मोठी मदत झाली. दर दोन-अडीच तासाच्या अंतरावर पेट्रोल पंप असून त्याच ठिकाणी विश्रांतीसह जेवणाची उत्तम सोय करुन दिली जाते. तर बेशिस्त वाहनचालकांना रस्त्यांत वाहने थांबवून दंड घेण्याची पध्दतच परदेशात नाही. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला घरपोच ऑनलाइन दंड ठोठावला जातो, असा वेगळाच अनुभव परदेशी पर्यटनात आल्याचेही डॉ. शहा यांनी सांगितले.

"यामुळे' आपल्याकडेही वाढेल पर्यटन

  • पर्यटनस्थळी स्वच्छता, टापटीपणा, सुरक्षारक्षक, पार्किंगची असावी सोय
  • नियोजित वेळेत पर्यटन सहल पूर्ण करता यावी म्हणून दर्जेदार खड्डेमुक्‍त रस्त्यांची गरज
  • रस्त्यांत थकवा आल्यास थोडावेळ विश्रांतीची असावी सोय; त्याठिकाणीच जेवणाची असावी सोय
  • समुद्री पर्यटनासह धार्मिक पर्यटनाचे मोठे आर्कषण; त्याठिकाणी स्वच्छतेसह सुरक्षितता महत्वाची
  • पोलिसांची मिळावी वेळेत मदत; वाहतूक कोंडी होणार नाही याची घ्यावी खबरदारी

 

देशाच्या उत्पन्नात पर्यटनाचा मोठा वाटा
अमेरिका, चीन, युरोप, श्रीलंका, मलेशिया, फिलिपाईन्स, शिंगापूर, रशिया, नेपाळ या देशांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. रस्ते चौपदी असल्याने वाहतूक कोंडीच होत नाही. पोलिसांचे मोठे सहकार्य मिळते, रस्त्यांवर पोलिसच दिसत नाहीत. दोन-अडीच तासांच्या प्रवासांनतर पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची उत्तम सोय आहे. पर्यटनाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षिततेसह गाईड्‌स असतात. त्यामुळे त्या देशांच्या उत्पन्नात पर्यटनाचा मोठा वाटा राहिला आहे. 
- डॉ. शितकुमार शहा, पर्यटक, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Shah said! Abroad there are no police on the streets; There is no fatigue even after traveling a thousand kilometers