जिल्ह्यात वाढले 52 हजार वाहनचालक ! अठरा वर्षांपेक्षा कमी वय असताना वाहन चालविल्यास पालकांवर गुन्हा 

RTO.
RTO.
Updated on

सोलापूर : कोरोनानंतर वाहतूक पोलिस, आरटीओ आणि स्थानिक व राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर-जिल्ह्यात आठ महिन्यांत 52 हजार 487 वाहनचालक वाढले आहेत. वाहनांची संख्या आता 16 लाखांहून अधिक झाली असून, त्यात मालवाहतूक व दुचाकीस्वार, चारचाकी वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, 18 वर्षांहून कमी वय असलेला मुलगा किंवा मुलगी वाहन चालवत असल्यास संबंधित मुलांच्या पालकांवरही गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिला आहे. 

जिल्ह्यातील अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंत तीन हजार 579 पक्‍के परवाने वितरित झाले आहेत. तर नऊ हजार 544 शिकाऊ परवाने वितरित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. दुसरीकडे, सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून आठ हजार 103 पक्‍के परवाने तर 21 हजार 261 शिकाऊ परवाने वितरित झाले आहेत. आरटीओ कार्यालयास परवान्यातून सुमारे 50 लाखांहून अधिक रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

दरम्यान, आता ग्रामीण भागातील वाढलेले अपघात कमी करण्याच्या हेतूने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. एप्रिलपासून त्यांच्याकडून तब्बल 30 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट आणि वाहन चालविण्याचा परवाना दुचाकीस्वारांकडे असावा, विनापरवाना वाहन चालवू नये, असे आवाहन अर्चना गायकवाड यांनी केले आहे. 

आठ महिन्यांत 13 रिक्षांची विक्री 
शहरातील रिक्षांची संख्या सुमारे 12 हजारांहून अधिक आहे. महापालिकेची परिवहन व्यवस्था आर्थिक अडचणीत सापडल्याने शहरातील विविध मार्गांवर अवघ्या दहा ते 12 बस धावत आहेत. परंतु, शहरातील प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प असल्याने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दरवर्षी साधारणपणे अडीच हजारांपर्यंत वाढ होते. मात्र, यंदा कोरोनाचे संकट आणि प्रवासी घटल्याने रिक्षांची विक्री ठप्प झाली आहे. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंत शहरात केवळ 13 रिक्षांची विक्री झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. तर चारचाकी व दुचाकींची विक्री वाढल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com