बार्शी तालुक्‍यात सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी 

कुलभूषण विभूते 
Tuesday, 22 September 2020

बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्‍यात सर्वांत जास्त सोयाबीन पीक पेरलेले आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आलेले आहे, त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच पाणी व रोगट हवामानामुळे सोयाबीनचे पीक झाडालाच नासू लागले आहे. 

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्‍यात सर्वांत जास्त सोयाबीन पीक पेरलेले आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या भरात आलेले आहे, त्याच वेळी सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच पाणी व रोगट हवामानामुळे सोयाबीनचे पीक झाडालाच नासू लागले आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. 

तालुक्‍यातील अशा नुकसान झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. या वेळी भास्कर काकडे, प्रमोद पाटील, युवराज काजळे, प्रशांत भड, संदीप भड आदी गौडगावचे व तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. 

यंदा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी सहा एकर सोयाबीन पेरले. पीक चांगले व काढणीला आले असताना सतत सहा दिवस झालेल्या पावसामुळे व शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे उत्कर्ष देशमुख (रातंजन, ता. बार्शी) यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to continuous rains soybean crop in Barshi taluka was severely damaged