खायला अन्न नाय... जगायचे कसे... जगणं बनलयं अवघड (Video)

सुस्मिता वडतिले
Sunday, 29 March 2020

"कोरोना' व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे शहरी नागरिक ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. रेवणसिद्धेश्‍वर मंदिरशेजारी राजस्थानी मारवाडी कुटुंबावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सध्या "लॉकडाउन' असल्याने मूर्त्या विक्री करणे अवघड झाले आहे.

सोलापूर : काही दिवसांपासून कोरोनामुळे घरात अन्न नाय नी काय नाय...आम्ही जगायचं कसं...आमची चार-चार पोरं हायती... कसं करणार...कोण मदत पण करेना झालंय...काम केले तर खायला मिळेना झालंय... काम नाय काय नाय, मूर्त्या विकण्यास गेलं तर मारत्यात.. मग काय घरातच बसून राहायचं का... अन्न मिळेल तेव्हाच खाणारं ना... परदेशी गावाला जायचे आहे. परंतु, "कोरोना'मुळे गावाला जाता येत नाही. खाण्यासाठी पैसे लागतात, परंतु जवळ पैसाच नाही, मग आम्ही कसे जगणारं. ही अशी व्यथा आहे, रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरात गणपती, मानव मूर्ती आणि अन्य मूर्त्या बनविणाऱ्या कलाकरांची. 
"कोरोना' व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे शहरी नागरिक ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. रेवणसिद्धेश्‍वर मंदिरशेजारी राजस्थानी मारवाडी कुटुंबावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सध्या "लॉकडाउन' असल्याने मूर्त्या विक्री करणे अवघड झाले आहे. मूर्त्या तयार असूनही ग्राहक नसल्याने मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या भागात 20-25 वर्षांपासून राजस्थानी मारवाडी कलाकार वास्तव्यास आहेत. तेथे सध्या 50 कुटुंबं असून सर्वजण मिळून मूर्ती बनवण्याचे काम करतात. या कलाकरांची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांच्या कुटुंबातील चिमुकले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे चिमुकलेही कुटुंबातच आई-वडिलांना कामात हातभार लावतात. सध्या "कोरोना'मुळे यांच्या व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड व पैसाही नाही. कोणीही कसल्याही प्रकारची मदत करत नाहीत, आम्हाला अन्नधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी राजस्थानी मारवाडी मूर्तिकरांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 

आम्ही जगणार कसे
25 वर्षांपासून या भागात मूर्त्या बनवत आहोत. आतापर्यंत पहिल्यांदा आमच्यावर अशी वेळ आली आहे. मूर्त्या तयार असून विक्री होत नाहीत. मूर्त्या विकण्यास बाहेर गेले असता पोलिस मारत असून, आम्ही जगणार कसे. 
-दुर्गा राठोड 

कोणीही कसलीच मदत करत नाही
कुटुंबात सदस्यांची संख्या मोठी आहे. त्यात कोरोनामुळे सध्या व्यवसाय ठप्प आहे. कसल्याही प्रकारची मूर्तीची विक्री होत नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोणीही कसलीच मदत करत नाही. सध्या काय करावे आणि कसे जगावे याची चिंता सतावत आहे. 
-मघाराम भाटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the corona it is difficult for the workers to survive