कोरोना : दुग्ध व्यवसायाला बसलाय 70 टक्के फटका

Milk
Milk
Updated on

सोलापूर : उन्हाळ्यात लस्सी, मठ्ठा व ताक तसेच या काळातील लग्नसराईमुळे खवा, दही, पनीर आदी दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दुग्धोत्पादनाला मागणी घटल्याने याचा 70 टक्के फटका दुग्ध व्यावसायिकांना बसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

एका व्यावसायिकाकडून फक्त 200 ते 250 लिटरची खरेदी
उन्हाळ्यात दुधाला मागणी जास्त असते. या काळात शेतकरी व गवळ्यांकडून एक दूध डेअरीचालक दररोज 600 ते 700 लिटर दुधाची खरेदी करतात. या कालावधीत डेअरीतून व फिरत्या विक्रेत्यांकडून लस्सी, मठ्ठा व ताकाला तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमधील मिठाईसाठी खवा, दूध, दही, मलई, श्रीखंड, बासुंदी आदी पदार्थांना मागणी असते. तसेच किराणा दुकानदारांकडून दूध व दह्याच्या पाकिटांची रोजची मागणी असते. या कालावधीत लग्नसराईची रेलचेल राहात असल्यामुळे गुलाब जामून, पनीर, मठ्ठा आदींसाठीही दुधाची गरज असते. उन्हाळ्यातील चार महिने हे दुग्ध व्यावसायिकांसाठी सुगीचे दिवस असतात. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दुग्ध व्यवसायावर गंडांतर आले आहे. सध्या 200 ते 250 लिटरची खरेदी दुग्ध व्यावसायिक करीत आहेत.

दुग्ध व्यवसायावर झालेला परिणाम

  • कर्फ्यूमुळे हॉटेल, रेस्टॉरंटकडून खवा, दूध, दही, मलई, श्रीखंड, बासुंदी, लस्सी आदी पदार्थांची मागणी पूर्णत: झाली बंद
  • फिरते विक्रेते घराबाहेर पडत नसल्याने मठ्ठा, लस्सीसाठी लागणाऱ्या दह्यालाही नाही मागणी
  • विवाह सोहळे रद्द झाल्याने खवा, पनीर, ताक, दही विक्रीवर झालाय परिणाम
  • परिसरातील किराणा दुकानदारांकडूनही नेहमीपेक्षा मागणी झाली कमी
  • नाशवंत असल्यामुळे शिल्लक दुधापासून इतर पदार्थ तयार केले जातात, मात्र त्यांना मागणीच नाही
  • दररोज 600 ते 700 लिटरची मागणी घटून आली 200 ते 250 लिटरवर

कर्फ्यूमुळे दुग्ध व्यवसाय 70 टक्के घटला आहे. अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्यामुळे डेअरी चालू ठेवावी लागते. नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी दूध व दही यांचीच किरकोळ मागणी आहे. चार महिने सीझनमध्ये चार पैसे मिळत होते, मात्र कर्फ्यूमुळे यावर्षी दुग्ध उत्पादक, शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
- किरण हिरेमठ,
दूध डेअरी चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com