03School_20fb_20_20Copy_2.jpg
03School_20fb_20_20Copy_2.jpg

शिक्षणाधिकाऱ्यांची मुख्याध्यापकांना ताकीद ! शाळांमध्ये 50 शिक्षकांनाच बोलवा

Published on

सोलापूर : शहर-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यातील शाळा बंदच राहणार असून दहावी-बारावीचे वर्ग, सराव परीक्षा, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद केले जाणार आहे. तर प्रत्येक शाळांमध्ये एकूण शिक्षक संख्येच्या 50 टक्‍के शिक्षकांनाच शाळेत बोलवावे, असे आदेश आहेत. त्यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले, सर्व मुख्याध्यापकांनी त्या निर्बंधाचे कडक पालन करावे.

मुख्याध्यापकांनी निर्बंध काटेकोर पाळावेत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने निर्बंधाची नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत स्वतंत्र आदेश काढून मुख्याध्यापकांना सूचना केली जाईल. प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांनी दररोज 50 टक्‍के शिक्षकांनाच शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात. 
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्‍तीस योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. त्यांच्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक व आवश्‍यक वस्तू सोडून अन्य सर्व दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. खासगी व सार्वजनिक वाहतूक नियमित सुरु राहणार असून रिक्षात चालकासह तिघे, टॅक्‍सीसह अन्य वाहनांमध्ये 59 टक्‍के प्रवासी असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मनोरंजन, करमणुकीची ठिकाणे, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्‍स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, क्‍लब्स, जलतरण तलाव, क्रिडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहणार आहेत. प्रार्थनास्थळे बंद ठेवली जाणार असून दैनंदिन पुजेसाठी परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहे व बार पुर्णपणे बंद राहणार असून पार्सलची सेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार त्याच वेळेत होणार
  • शहर-जिल्ह्यात सुरु असलेले दहावी-बारावीचे वर्ग उद्यापासून (सोमवारी) राहणार बंद
  • खासगी कोचिंग क्‍लासेस सुरु न करण्याचे आदेश; क्‍लासेसला लावावे लागणार पुन्हा कुलूप
  • शाळांमध्ये शिक्षकांची असावी 50 टक्‍केच उपस्थिती; शिक्षणाधिकाऱ्यांची मुख्याध्यापकांना सक्‍त ताकीद
  • शासनाच्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर तथा शाळांवर कारवाईचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com