या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था राहणार बंदच; यांनी काढले आदेश 

या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था राहणार बंदच; यांनी काढले आदेश 

सोलापूर ः शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा) यांची कार्यालये/कर्मचारी केवळ ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करण्यासह शिक्षणाव्यतिरिक्त (नॉन टीचिंग) उद्देशाने कामकाज करण्यास परवानगी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांविना बंदच राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. हा कालावधी आता 31 जुलैपर्यंत असणार आहे. हे आदेश नवीन सुधारीत सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लागू करण्यात आले आहेत. 

65 वर्षे वयावरील व्यक्ती, गंभीर आजारी असलेले रुग्ण, गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच रहावे. त्यांना अत्यावश्‍यक कामासाठी व आरोग्यविषयक कारणासाठी निर्देशाचे पालन करणे आवश्‍यक राहील. प्रतिबंधीत सांसर्गीक क्षेत्रामध्ये अत्यावश्‍यक बाबी वगळता निर्बंध कडक राहतील. सर्व सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीला अटी/शर्थीनुसार चालू असतील. यामध्ये दुचाकी वाहन (मोटरसायकल) केवळ चालक, तीनचाकी वाहन 1+2, चारचाकी वाहन 1+2. जिल्हाअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के इतक्‍या मर्यादेपर्यंत आणि सुरक्षित शारिरीक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून सुरु राहतील. आंतरजिल्हा हालचाल/ये-जा यांचे नियमन केले जाईल. 
सर्व बिगर अत्यावश्‍यक सेवा देणारी दुकाने/मार्केट ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी राहतील. लग्न समारंभाचे आयोजन खुल्या जागा, लॉन्स, विनावातानूकुलीत मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरामध्ये करण्यास परवानगी असेल. क्रिडा संकूल/स्टेडियमचा बाह्य भाग आणि इतर खुल्या सार्वजनिक जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. प्रेक्षक व सांघिक क्रिडा प्रकार करण्यास परवानगी असणार नाही. बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या एखाद्या भागात शारिरीक हालचाली अथवा व्यायाम करण्यास परवानगी असणार नाही. सर्व व्यायाम आणि इतर उपक्रम सुरक्षित अंतराचे निकष पाळून करावेत. वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण (घरपोच वितरण) यांना परवानगी आहे. राज्य शासनाने ज्या केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना परवानगी दिलेली आहे. 
सर्व सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी व प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे. 
दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर असल्याची खात्री करावी. तसेच पाचपेक्षा अधिक ग्राहकांना एकावेळी दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी आहे. अंतयात्रा/ अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा व तंबाखू सेवनास कडक निर्बंध असतील. जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचाऱ्याकडून घरातून काम करुन घ्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, मार्केट, तसेच औद्योगिक व वाणिज्यीक आस्थापनामध्ये कामाच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. कामाच्या प्रवेशाच्या ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग, हॅन्डवॉश, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कामाचे ठिकाण व शिपट बदलताना कर्मचारी यांच्यासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी दरवाजे, हॅन्डल, वारंवार स्वच्छ व सॅनिटाईझ करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी कामगारांमध्ये योग्य ते सुरक्षित अंतर असेल तसेच शिफटदरम्यान पुरेसे वेळेचे व सुरक्षित अंतर सुनिश्‍चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन कालावधीमध्ये शिथिलता ठेवावी. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com