सोलापूर शहर-जिल्ह्यात आज कोरोनामुळे आठ पुरुषांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

सोलापूर ः कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाणा जास्त असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आजही शहर-जिल्ह्यात आठ पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामधील सात जण ग्रामीण भागातील तर एक पुरुष सोलापूर शहरातील आहेत. 

सोलापूर ः कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाणा जास्त असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आजही शहर-जिल्ह्यात आठ पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामधील सात जण ग्रामीण भागातील तर एक पुरुष सोलापूर शहरातील आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यात आज 132 जण नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरातील 25 तर ग्रामीण भागातील 107 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार जेवढे रुग्ण आढळले आहेत. त्यापेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. आज दसऱ्याच्या मुहुर्तावर कोरोनामुक्त झाल्याने शहर-जिल्ह्यातील 306 जणांना घरी सोडले आहे. त्यामध्ये 122 जण सोलापूर शहरातील तर 184 ग्रामीण भागातील लोकांचा समावेश आहे. कोरोनामवर मात केल्यामुळे शहर-जिल्ह्यात आतापर्यंत 34 हजार 465 जण सुखरुप आपापल्या घरी पोचले आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 796 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागातील 35 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. कोरोनाग्रस्त झाल्याने अद्यापही तीन हजार 394 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 
कोरोनामुळे आतापर्यंत एक हजार 411 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये शहरातील 526 तर ग्रामीण भागातील 885 जणांचा समावेश आहे. लिंकरोड पंढरपूर येथील 36 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight men died of corona today in Solapur