एकरुख तलाव भरला ! अवंतीनगर, वसंत विहार, मडके वस्ती, गणेश व गायत्री नगरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

0Galorgi_20Lake.jpg
0Galorgi_20Lake.jpg
Updated on

सोलापूर : हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. एकरुख तलाव सोलापूर- तुळजापूर या राष्ट्रीय मार्गावर असून तो शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. एकरुख तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला असून अतिवृष्टी झाल्यास सांडव्यातून 400 क्‍युसेक्‍स विसर्गाने पाणी येईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. तर शहरातील अवंती नगर, अभिमान श्री, वसंत विहार, यश नगर, गायत्री नगर, गणेश नगर, मडके वस्ती परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंत्यांच्या पत्रानुसार... 

  • सोमवारच्या (ता. 19) पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार एकरुख तलाव 100 टक्‍के भरला
  • एकरुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा विसर्ग वाढल्यास सांडव्यातून पाणी जास्त सुटेल
  • सांडव्यातून अंदाजे 400 क्‍युसेक्‍स विसर्गाने पाणी खालील ओढ्यातून पुढे जाईल
  • शहरातील अवंती नगर, अभिमान श्री, वसंत विहार, यश नगर, गायत्री नगर, गणेश नगर, मडके वस्तीला सर्तकतेचा इशारा
  • या परिसरातील शंभर कुटुंबांना हलविण्याचे महापालिका आयुक्‍तांनी केले नियोजन

एकरुख मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा विसर्ग सुरु राहिल्यास प्रवाहात वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातून खाली येणाऱ्या सांडव्याचा विसर्ग वाढल्यास शहरालगतच्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. त्यांनी तातडीने महापालिका आयुक्‍तांना पत्र पाठवून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना केल्या आहेत. तत्पूर्वी, महापालिका आयुक्‍तांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची पाहणी करुन नागरिकांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या पर्यायी राहण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे आयुक्‍तांनी यापूर्वीच सांगितले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, काही समस्या असल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Marathi News Esakal
www.esakal.com